पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/365

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखांचा सूर होता.
 खरे तर पंडित नेहरूंनाही ब्रिटिशांनी विकसित केलेली प्रशासकीय चौकट पसंत नव्हती. त्यांनी आपल्या आत्मचरित्रातही लिहून ठेवले आहे. "But of one thing I am quite sure, that no new order can be built up in India as long as the spirit of ICS pervades our administration and our public services. Therefore it seems to me quite essential that the ICS and similar services must disappear completely, as such, before we can start real work on a new order." पण त्यांनी किंवा त्यांच्या या मताशी सहमत असणा-या इंदिरा गांधींनी या दिशेने काही प्रयत्न केले नाहीत. अर्थात, त्यांची ही मते चिंतनीय आहेत व वरिष्ठ पातळीवरील ब्यूरॉक्रसीबाबत प्रश्नचिन्हे निर्माण करणारी आहेत.
 स्वातंत्र्यानंतर काही वर्षे जनतेने ‘मायबाप' सरकार म्हणून प्रशासकांची हडेलहप्पी सहन केली, पण तळागाळापर्यंत लोकशाही रुजत गेल्यावर जनतेच्या विकासाच्या आकांक्षा वाढत गेल्या. संवेदनाहीन प्रशासन ते ओळखू शकत नसल्यामुळे जनतेची नाराजी वाढत चालली आहे. अधिकाराचे प्रशासनातले प्रचंड विकेंद्रीकरण, बेपर्वा वृत्ता आणि भ्रष्टाचारामुळे भारतीय प्रशासन बदनाम झाले आहे.
 शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी महाराष्ट्र सरकारच्या पाणीपुरवठा स्रोताच्या ५०० मीटर परिसरातील उपसाबंदीच्या निर्णयावर टीका करताना काही वर्षापूर्वी "Birbals and Aesops in Mumbai!" या शीर्षकाचा परखड लेख लिहिला होता, त्यात त्यांनी अकबर - बिरबलाची कहाणी सांगुन अधिकारी कसा भ्रष्टाचार करतात याचे मार्मिक विवेचन केले आहे. त्यांच्या लेखाच्या पहिल्या परिच्छेदाचा मा इथे स्वैरानुवाद देत आहे.
 बादशहा अकबराने दरबारातील अधिका-यांचा भ्रष्टाचार कानी आल्यावर बिरबलापुढे उद्गार काढले, “हे साहजिक नाही का? Power corrupts, and absolute power corrupts absolutely." त्यावर बिरबल म्हणाला, "Corrupt official do not need power to be corrupt. They can invent power." आणि पाण्याच्या लाटा मोजताना नावाड्यांचा अडथळा होतो म्हणून नौकानयनावर बंदी घातला, तव्हा नाविकांनी पैसे देऊन नावा सुरू केल्या, हे दाखवून देत बिरबलाने आपला मुद्दा बादशहाला पटवून दिला.

 भारतीय नोकरशाही नागरिकांच्या नजरेतून कशी आहे याचे वर्णन करायचे झाले तर इंग्रजी भाषेतील A to Z अशी यच्चयावत विशेषणे लावता येतील, असे बखरीच्या पहिल्याच अध्यायात मी लिहिले होते. ती Arrogant, corrupt, discourtious, irresponsible and insensitive, manipulative, negative, torturous वगैरे

लक्षदीप ■ ३६५