पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/362

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

च्या तंत्राद्वारे! हे तंत्र एडवर्ड डी बोनो यांनी विकसित केले आहे. ते तंत्र प्रामुख्याने व्यवस्थापन विश्वात निर्णय घेण्यासाठी वापरले जाते. पण ते कोणत्याही विषयाबाबत निर्णय घेताना, निष्कर्ष काढताना वा विचार करताना वापरता येऊ शकते. किंबहुना आज मी त्याचा वापर स्वातंत्र्योत्तर काळातील ब्यूरॉक्रसीच्या कामकाजाच्या संदर्भात करणार आहे, ते खचितच उद्बोधक वाटेल!
 पांढरी हॅट ही माहिती व आकडेवारी भर देत भूतकाळातील घटना पाहाते आणि वज्र्य विषयाची संपूर्ण माहिती देते. तांबडी हॅट ही त्या विषयाच्या भावनेच्या अंगाने व इंट्यूशनच्या आधारे विचार करते, इतर लोक याकडे कसे पाहात असतील याचा मानसिक अंगाने विचार करते. काळी हॅट ही निराशावादी, संरक्षणात्मक पद्धतीने विचार करते. ती संबंधित विषयातील दोष नजरेस आणूस देते व कच्चे दुवे तपासते. नवा विचार, संकल्पना या व्यवहार्य कशा नाहीत हे सांगते, तसेच भविष्यातील धोकेही कथन करते. पिवळी हॅट ही सकारात्मक विचार करते. ती आशावादी असते व वण्र्य विषयाचे फायदे पाहाते, त्याचा मूल्यात्मक विचार करते. हिरवी हॅट म्हणजे सृजन किंवा 'क्रिएटिव्हिटी' - ती वयं विषयाबाबत 'आऊट ऑफ बॉक्स’ विचार करीत, नवा विचार संकल्पना देत, जुन्या प्रश्नांची नवी निर्मितिक्षम उत्तरे शोधायचा प्रयत्न करते., शेवटची हॅट ही निळी हॅट आहे. ती बाकी पाच विचारांचा मेळ घालते. मीटिंगमध्ये वा परिसंवादामध्ये अध्यक्ष असणारी व्यक्ती निळी हॅट घालते. जेव्हा बाकी पाच हॅटसचे विचार थांबतात, तेव्हा निळी हॅट प्रथम हिरव्या हॅटला उत्तेजन देते, आणीबाणीच्या प्रसंगी काय करावे हा प्रश्न पडतो तेव्हा काळ्या हॅटला विचारून दोष जाणून घेते व पिवळ्या हॅटच्या मदतीने ‘कॉटिजन्सी प्लॅन’ निर्दोष बनवते.
 भारतीय प्रशासन - प्रामुख्याने ब्यूरॉक्रसी - बाबत मतभिन्नता आहे. ती कितपत उपयुक्त आहे; ती खरंच लोकांची कामे करते की, केवळ कागदी घोडे नाचवते इथपासून, ती बंद करणे कसे योग्य आहे, असा मतामतांचा गलबला आजही चालू आहे. त्या सान्यांचा आढावा 'सिक्स थिंकिंग हॅटस्’द्वारे घेतला तर एकाच अध्यायात सर्व बाजू वाचकांना पाहता येतील आणि मग ते निळी हॅट घालून विचार करू लागतील.
१. पांढरी हॅट काय म्हणते?

 भारतीय प्रशासनाची स्वातंत्र्योत्तर काळातील वाटचाल संख्यात्मक बाजूने पाहिली तर तिचे कार्य भरीव म्हणता येईल. त्याचप्रमाणे पंडित नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्था आणि सोविएत युनियनच्या प्रभावाने योजनाबद्ध विकासाचा मंत्र जपत ‘सरकार सर्व काही करू शकतं' या श्रद्धेने व विश्वासाने अक्षरशः सर्वच क्षेत्रे आपल्या ताब्यात घेतली. अगदी हॉटेल चालवणे (आय. टी. डी. सी. व आपली एम. टी. डी. सी. ची ‘हॉटेल्स, रिझॉर्टस् व विश्रामगृह) तसेच जनतेला ब्रेड (पाव) देण्यासाठी 'मॉडर्न

३६२ ■ लक्षदीप