पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/347

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हॅव नो डाऊट अबाऊट युवर सिन्सिरिटी अँड इंटिग्रिटी. ओ. के., लेटअस टेक कॉशिअस डिसिजन. आपण अपील जरूर करू या."
 तो विशेष भूमी संपादन अधिकारी त्या निर्णयानं चांगलाच अस्वस्थ झाला होता. त्याला काहीतरी बोलायचं होतं. सांगायचं होतं. पण हिंमत होत नव्हती. तरीही धीर गोळा करून, चंद्रकांतच्या कानाशी लागत म्हणाला,
 “सर, मी काही सांगावं असं नाही. पण यात बडे उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी गुंतलेले आहेत. त्यांचं सारं काही ठरलं आहे. आजच्या मीटिंगमध्ये अपील करायचं नाही असं ठरलं की, तिकडे आठ दिवसात शासनाची कोर्टाच्या नियमाप्रमाणे वाढीव मोबदला अदा करायची परवानगी व निधी मिळणार आहे."
 "ते मला माहीत आहे, पाटील."
 "सर, जिल्हा प्रशासनावर व खास करून माझ्यावर माजी नगराध्यक्ष व आमदाराचा भारी दबाव आहे” पाटील म्हणाले, “तुम्ही स्वत:ची माहिती व ज्ञान उघडे केलं नसतं तर आमच्या शहरातील इतर प्रकरणांचा न्याय लावून यातही अपील करायचं नाही, असा निर्णय झाला असता, मॅडमही तयार होत्या. पण..."
 “पाटील, प्लीज स्टॉप धिस." चंद्रकांतला प्रयत्न करूनही आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. “आपण इथं शासनाचं हित पाहून निर्णय घ्यायला बसलो आहोत. या अपील न करण्याच्या निर्णयाचा शासनाला किती भुर्दंड बसणार आहे, माहित आहे? सुमारे सत्तर लाख रुपये... ते वाचतील आपण अपील केलं तर; आणि हायकोर्टात आपण जिंकू शकतो. सफिशिअंटली स्ट्राँग केस आहे आपली."
 “काय चाललंय तुम्ही दोघांत एवढं? आम्हाला तरी कळू द्या, उपायुक्त - साहेब," मॅडम हसत हसत म्हणाल्या, तसे पाटील चंद्रकांतपासून दूर झाले.
 चंद्रकांत उद्वेगाने म्हणाला “इट इज द सेम स्टोरी अगेन अँड अगेन. अँज फार अज धिस डिस्ट्रिक्ट इज कन्सर्ड. तीच संबंधित जमीनमालक, वकील आणि जज्जची अभद्र युती; तेच अव्वाच्या सव्वा जमिनीचे दर वाढवून देणे आणि तेच आपण अपीलात जाऊ नये म्हणून दबाव आणणे... या प्रकरणातही हे सारं घडत आहे. जसं ते पाटीलना अॅप्रोच झाले व दबाव आणला, तसा माझ्यावरही तोच प्रयोग तेव्हा झाला. पण असफल.”

 चंद्रकांत उपसचिव मॅडमना एवढं स्पष्टपणे सांगतील असं पाटीलांना वाटलं नव्हतं. पण त्यांना त्या दोघांच्या समान समाजहितैषी दृष्टिकोनाची व भूसंपादन प्रकरणामुळे न्याययंत्रणेत भ्रष्टाचाराच्या शिरलेल्या बकासुरी वृत्तीची चीड होती, त्याची कल्पना नव्हती. चंद्रकांतने उपायुक्त (पुनर्वसन व भूसंपादन) चा पदभार स्वीकारल्यापासून त्याच्या उपसचिव, विधी व न्याय आणि संबंधित भूसंपादन अधिका-यांसोबत होणाया प्रत्येक बैठकीत, प्रत्येक प्रकरणात तो खोलात जायला लागल्यापासून ज्या बाबी पुढे

लक्षदीप ■ ३४७