पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/343

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिनेमानंतर रात्री बारा वाजता त्या दोघींना रेल्वे स्टेशनावर सोडण्यासाठी ते गेले होते. ट्रेन आधीच निघून गेली होती. म्हणून रेल्वे गेस्ट हाऊसमध्ये चला म्हणून त्यांनी त्या दोघींना गुडस यार्डात नेलं व आळीपाळीने बलात्कार केला.
 कलेक्टरांनी लक्ष घातल्यामुळे तपासाची चक्र वेगाने फिरू लागली. त्या तिघा संशयित आरोपींपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं. त्यांच्या जबानीतून हा सारा प्रकार प्रदीपनं (माजी जिल्हा अध्यक्षाच्या पुत्रानं) रचल्याचं निष्पन्न झालं. तो व त्याचा मित्र फरार झाले होते.
 वृत्तपत्रांनी हे वासनाकांडाचं प्रकरण लावून धरल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. पण आरोपी पकडले जात नव्हते. त्यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनावर टीका होत गेली. त्याची गांभीर्याने दखल घेत कलेक्टरांनी पोलीस अधीक्षकांना व पोलिस अधिका-यांना सांगितले.
 “तुम्ही माजी अध्यक्षांना भेटून तपास करायचा प्रयत्न केला आहे. त्यांना आज पुन्हा भेटा व सक्त वॉर्निग द्या की, जर तीन दिवसात प्रदीप आपणहून पोलिसांपुढे हजर झाला नाही तर त्याला पळून जाण्यास व फरार होण्यास मदत केली म्हणून तुम्हाला अटक केली जाईल. माझा होरा आहे की, हे तंत्र यशस्वी ठरेल."
 कलेक्टरांची ही जालीम यात्रा लागू नडली.“प्रदीप पोलिसांना शरण येईल. त्याला दोन दिवसांची मुदत द्या." असं अध्यक्षांनी सांगितलं. त्यानुसार प्रदीप आज शरण यायला हवा होता. तो जर शिष्टमंडळाच्या भेटीपूर्वी पोलीस ठाण्यात हजर झाला तर संवेदनक्षम प्रशासनाचा पुरावाच देता आला असता.
 पण तसं घडलं नाही. प्रदीप हजर होईपर्यंत त्याची वाच्यता करणंही गैर होतं. म्हणून कलेक्टरांनी शांतपणे महिलांच्या संतप्त भावनांना तोंड दिलं. भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळातील महिला एकामागून एक टीकेचे आसूड ओढत होत्या.
 “प्रशासनाचा तोंडावळा तसेच मनोरचनाही पुरुषीच आहे. कलेक्टरसाहेब, त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आरोपी बलदंड पुढा-याचा बिघडलेला मुलगा आहे व त्याला वाचविण्याचा खटाटोप चालू आहे, म्हणूनच अजूनही तो फरार आहे. फुले, कर्वे, आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यात स्त्रीची अब्रू आज किती स्वस्त झाली आहे. त्यांचं सोयरसुतक आज कुणालाच नाही याचा मला तीव्र खेद वाटतो."
 कलेक्टरांनी सा-यांचं बोलणं झाल्यावर उत्तर देताना म्हटलं, “तुमच्या संतप्त भावना मी समजू शकतो आणि झाला प्रकार निंद्यच आहे. त्याबाबत प्रशासन संवेदनशील जरूर आहे. आरोपी लवकरच पकडले जातील. आम्ही प्रशासकीय अधिकारीही सामाजिक कार्यकत्र्याच्या भावनेनेच याकडे बघतोय."

 औरंगाबादहून आलेल्या एका बोलभांड महिला कार्यकर्तीनं हेटाळणीच्या सरात

लक्षदीप ■ ३४३