पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/316

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचारलं तेव्हा मी उत्स्फूर्तपणे बोलून गेलो की, “यंदा माहेरी जायचं नाही व वर्ग चुकवायचे नाहीत. आता तुम्ही लिहू शकला तर चार ओळींचं पोस्टकार्ड आम्हांला लिहा की, आम्ही माहेरी न जाता साक्षरतेची नागपंचमी साजरी केली. त्यांनी 'हो' म्हटलं. त्यांना मी आमचा पत्ता लिहून शंभर पोस्टकार्डे पाठवून दिली आणि काय आश्चर्य, जवळपास ऐंशी पोस्टकार्ड उत्तरासह परत आली व त्यांनी मला, संधूंना भाऊ मानून पत्र लिहिलं, “आम्ही तुमच्या शब्दाला मान देऊन यंदा माहेरी गेलो नाही. आता श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी तुम्ही आमच्या वाडीस या, महादेवाच्या मंदिरात तुमच्या समक्ष साक्षर नागपंचमी साजरी करू...' ही पत्रं वाचताना मन भरून आलं होतं. जर एखादं काम मनापासून करायचा प्रयत्न केला तर ग्रामीण जनता भरभरून प्रतिसाद देते. या साक्षरता अभियानानं प्रत्येक साक्षर प्रौढ स्त्री आमची राखी-बहीण झाली... हे भाग्य किती मोठे व कुण्या जन्मीचं म्हणायचं? साक्षरता अभियानाच्या यशाची ही पावती म्हणायची नाही?
 हा आणखी एक प्रसंग, परभणी शहरात मुस्लीम बांधव-भगिनींसाठी आम्ही प्रौढ साक्षरतेचे वर्ग उर्दूमधून चालवत होतो. त्या निमित्तानं पंधरा ते वीस वयोगटातल्या, मॅट्रिक झालेल्या अनेक चुणचुणीत मुलींचा एक छान ग्रुप तयार झाला. जिद्दीनं त्या पर्दानशीन महिलांना सुरुवातीला घरोघरी जाऊन गोळा करीत व जीव तोडून शिकवत.
 ‘हमें तो मुश्किलसे इल्म (विद्या) मिली है, वो बाटेंगे तो बढेगा।" अशी त्यांची त्या मागची प्रांजळ भावना होती. या वर्गास येणा-या प्रौढ मुस्लीम स्त्रियांना मी त्यांचा ‘हमदर्द' वाटायचो. इतका की, त्यातील काही माझ्यापुढे पर्दा पाळायच्या नाहीत. ही। देखील माझ्या यशाची एक प्रकारे अनोखी पोचपावती होती! साक्षरता अभियानाचं काम संपल्यावर या शिक्षिकेचं काम करणा-या मुलींशी संपर्क तुटला नाही, तरी कमा होत चालला. काही महिन्यांनी एके रविवारी दुपारी एकच्या सुमारास, माझ्या बंगल्यात एक तरुण मुस्लीम युवक ऑटो रिक्षातून आला व म्हणाला, “सर, आज मेरे बहनको

काह है। आपने आनेका कबूल किया था। पर आप शायद भूल गये।" मी किंचित ओशाळला होत म्हणालो, “हां भाई, सचमुच मैं भूल गया।' त्याची बहीण मोठी पासणीत व हुशार होती. तिचा साक्षरतेचा वर्ग खूप चांगला चालायचा. “लेकिन सर, वो कहती है, जब तक सर (म्हणजे मी) नही आयेंगे, निकाह नहीं होगा।" त्यामुळे मी ताबडतोब लग्नस्थळी गेलो, निकाह झाला. त्यानंतर जोडीनं पाया पडत ती नातव्याला म्हणाली, “मियां, सर मेरे बड़े भाई है, उनके सामने निकाह हो गया, ये अच्छी बात है..." मी कृतकृत्य झालो होतो. कोण कुठली मुलगी! माझ्याशी समाज घडविण्याच्या, साक्षरतेच्या एका उदात्त कामाच्या निमित्तानं जोडली गेली होती, असं मी काय केलं होतं तिच्यासाठी की, तिनं मी येईपर्यंत निकाह समारंभ रोखन धरला? नंतर तिच्या नव-याला बँकेच्या मार्फत कर्ज व शासकीय अनुदान देऊन धंद्यासाठी

३१६ । लक्षदीप