पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समाजात घडणाच्या महत्त्वाच्या घटना व विषयांवरच लिहायचा, काही तरी सांगायचा प्रयत्न मी करत आलो आहे. माणसाला सामाजिक जीवन जगताना, देश / राज्याचे नागरिक म्हणून वागताना निर्माण होणारे प्रश्न, विषय यांचं चिंतन मी करीत असतो. जगण्यातून व प्रशासकीय कामातून जे अनुभव येतात, त्यांच्या आधारे लिहीत असतो. एका अर्थाने मी आजच्या काळाचा, आजच्या समाजजीवनाचा निरीक्षक आहे। व बखर लिहिणा-या बखरकाराचा आजचा वारस आहे. आजचा बखरकार म्हणजे रंजक पद्धतीनं, ललित अंगानं जीवनाचं गाणं गाणारा लेखक. तसा बनायचा प्रयत्न मी करीत आहे. माझी जीवनाची व्याख्या केवळ मध्यमवर्गीय जीवनच नाही, तर ग्रामीण महाराष्ट्र, प्रशासनापासून काश्मीर - अफगाणिस्तानपर्यंत आहे. त्यामुळे मला माझी ओळख (भविष्यकाळात) एक आंतरराष्ट्रीय दृष्टी व जाणीव असणारा साहित्यिक म्हणून झालेली आवडेल. त्यासाठी प्रयत्न करणं व माझ्या लेखनधर्माला अनुसरून वागणं एवढंच माझ्या हाती आहे. - = [] ३१२ ॥ लक्षदीप