पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कादंबरीतही (अफगाणिस्तानच्या पाश्र्वभूमीवर) मुस्लीम समाजातील एका वर्गात कुराण व हादिसचा हवाला देत वाढत जाणा-या मूलतत्त्ववादाचं आणि त्यातून निर्माण होणाच्या ‘तालिबानी’ कट्टरतेचं दर्शन की घडवलं होतं. (त्याचं विस्तृत परीक्षण ‘साधना'मध्ये अभिजित वैद्य यांनी केलं होतं.)
 माझ्या आजवरच्या लिखाणात मुस्लीम मनाचा शोध घेत केलेल्या लेखनाचा वाटा बराच आहे. म्हणजे किती? माझी पहिली प्रकाशित कादंबरी मुस्लीम समाजातील ‘सिनेमाबंदी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आहे. माझ्या आगामी कथासंग्रहाचं नाव आहे ‘पाचवी शहाबानो' त्यात प्रामुख्याने मराठवाड्यातील मुस्लीम समाजाच्या दयनीय स्थितीचं दर्शन घडविणा-या कथा आहेत.
 सध्या मी काश्मीर प्रश्नावरील कादंबरी लिहिण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातही काश्मिरी मुस्लीम मानसिकतेचा व सूफी परंपरेनं समृद्ध झालेल्या ‘गंगाजमनी' किंवा 'मिलीजुली' परंपरेचा धागा महत्त्वाचा आहे. झालंच तर, मागेपुढे हैद्राबाद ते (व्हाया कारगिल - श्रीनगर) काबूल कंदाहार अशी माझ्या लेखनप्रवासाची वाटचाल होणार आहे.
 एका अर्थानं मी ‘मुस्लीम ऑबसेस्ड' आहे. मुस्लीम धर्म व समाज मला एक भारतीय म्हणून समजून घ्यायचा आहे, कारण पंधरा ते अठरा टक्के लोकसंख्या असलेल्या मुस्लीम समाजाला सहृदयतेनं समजून घेत, ‘मिली-जुली' किंवा 'गंगाजमनी संस्कृती विकसित केल्याशिवाय या देशाची सर्वांगीण प्रगती होऊ शकणार नाही, असं माझं ठाम मत आहे, म्हणून भारतीय मुस्लीम जीवनाचं माझ्या परीनं हिंदूंना - खास करून मराठी समाजाला - दर्शन घडवायचं आहे. माझ्या वाचनातही इस्लाम व मुस्लीम समाजावरील इंग्रजी ‘फिक्शन' व 'नॉनफिक्शन'चा मोठा वाटा असतो व आहे. मुस्लिमांचा अर्थातच पुनर्जन्मावर विश्वास नसतो. पण हिंदू असल्यामुळे मी कधी कधी गमतीनं म्हणत असतो, ‘मी नक्कीच मागच्या जन्मी मुस्लीम असणार.”

 वाचकहो, आपल्याकडे बहुसंख्य लेखकांची भूमिका असते, की लेखन प्रतिभेनं स्फुरलं पाहिजे आणि ‘स्पाँटॅनिअस फ्लो ऑफ इमोशन्स” प्रमाणे ललित लेखन हे। विनासायास, सहज, उत्स्फूर्त असायला हवं, पण इंग्रजी लेखनामध्ये ऑर्थर हेलीसारख्या, विषयाचा सांगोपांग अभ्यास व संशोधन करून ललित लेखन करणाच्या लेखकांची फार मोठी व समृद्ध परंपरा आहे. तिचा मी पाईक आहे. आज जगात माहितीचा परिस्फोट झाला असताना, वाचकांचा कल वैविध्यपूर्ण लिखाणाकडे वाढला आहे. त्यामुळे इंग्रजी पुस्तकांच्या मराठी अनुवादांची मोठी लाट आली आहे. मराठीतही 'नॉनफिक्शन' पुस्तकांचा खप वाढतो आहे. हे सारं काय दर्शवतं? आजचा वाचक केवळ सभोवतालच्या जीवनाचं दर्शन घडविणाच्या लेखनात रस घेत नाही. त्याची भूक आणि जाणीव वाढती आहे. विविध विषयांवर वाचायला त्याला आवडतं. त्यामुळे

लक्षदीप ॥ ३०७