पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निराकरणही अधिक चांगलं करता येतं. दुस-या बाजूनं, सतत जागा असणारा लेखक त्यातून कथाबीज टिपत असतो. माझी ही जडणघडण ख-या अर्थानं कॉलेज जीवनात सुरू झाली, आजही चालू आहे व कधीच संपणार नाही. जीवनातली कुरूपता, अंधाररूपी प्रश्न व समस्या टिपण्यासाठी लागणारी दृष्टी मला आहे, तशीच आदर्शाची व मांगल्याची आस असणारी नजरही लागली आहे. विदारक वास्तव टिपणारी, पण सिनिक वा पराभूत न होता, त्यावर मात करण्यासाठी संघर्ष करणारी आशावादी वृत्ती माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनली आहे. अर्थात, त्याला माझ्या मध्यमवर्गीय मर्यादा जरूर आहेत, पण त्या मर्यादेतही चांगलं काम करता येतं, मूल्याधिष्ठित जीवन जगता येतं, हे काय कमी आहे?

 “उपदेश म्हणून नाही, पण स्वानुभवानं (आजवर मी जे करीत आलो, त्या आधारे) सांगतो, कामासाठी भेटायला येणा-या माणसांना कधी टाळू नकोस. कामासाठी येणाच्या प्रत्येक माणसाची एक समस्या असते. ती समस्या, त्याच्या जागी आपण आहोत असं समजून जाणून घे आणि सारी कल्पकता, अधिकार व कौशल्य ती समस्या सोडवण्यासाठी वापर. तू चांगला प्रशासक नक्कीच होशील!' पंचवीस वर्षापूर्वी उपजिल्हाधिकारी म्हणून सुरू केलेल्या प्रशासकीय कारकिर्दीच्या प्रारंभी मला एका ज्येष्ठ प्रशासकाने दिलेला हा कानमंत्र.
 “मला वाटतं लक्ष्मीकांत, आज मी मला मिळणाच्या पगाराइतकं काम नक्कीच केलं आहे. आता ऑफिसच्या बाहेर पडायला काहीच हरकत नाही. राज्यपालांच्या दोच्यासोबत तीन दिवस अष्टावधान बाळगत काम केल्यानंतर रात्री ८ वाजता कार्यालयात येऊन, पहाटे २ पर्यंत थांबून तीन दिवसांच्या साचलेल्या फाइली तपासून झाल्यावर घरी जाताना सांगत होते माझे पहिले प्रशासकीय गुरू, ज्येष्ठ आय. ए. एस. अधिकारी व्ही. पी. राजा. कार्यतत्परतेचा व प्रशासकीय नीतिमत्तेचा सर्वोच्च बिंदू म्हणावा असा तो प्रसंग मी अद्यापही विसरलेलो नाही!
 हे दोन प्रसंग वीस-पंचवीस वर्षापूर्वीचे. आणि आता अलीकडच्या काळातले दोन प्रसंग.....

 एक ज्येष्ठ मंत्री माझ्या कार्यालयास भेट देणार होते. काही कार्यक्रम नव्हता. पण माझ्या मुख्य कार्यकारी अधिका-याला वाटलं की, ते बहुधा महिला बचत गटाचं काम पाहण्यासाठी येणार आहेत. म्हणून त्यानं एक महिला मेळावा आयोजित केला. माझं नाव महिला बचत गटाशी इतकं संलग्न झालं आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण' हे माझं मिशन झालं आहे. राज्य शासनाच्या सेवेचा राजीनामा देऊन एका खाजगी कंपनीत रुजू झालेले पुण्याचे माजी आयुक्त प्रभाकर करंदीकर मला एकदा गप्पा मारताना सांगत होते. त्यांचा सूर विनोदी व हलकाफुलका होता,

लक्षदीप ॥ ३०१