पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/295

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "It is a women you see God has put in this place
 To stamp out despair ... with love and hope to replace."
 तुझ्या राष्ट्राध्यक्ष पुत्राला, बराक ओबामाला, तमाम मानवजातीला जे प्रेम व आशा वाटते, ते सार्थक करण्याचे सामर्थ्य तू दे.
 हे स्वतंत्रते भगवती, ज्यांना आमच्या मराठी भाषेत महाकाव्य न लिहिणारे महाकवी म्हटलं जातं, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वतंत्रतेच्या देवतेचं हे सूक्त रचलं. त्यांच्या मनात भारतमाता होती, पण व्यापक अर्थानं ते कोणत्याही स्वातंत्र्यकांक्षी देशाचं मुक्तिगीत होऊ शकतं, जशी तूही केवळ अमेरिकेची Statue of Liberty न राहता सर्व मानवजातीची झालीस. म्हणून माझ्यासाठी तू त्यांच्या शब्दातली व अर्थातली ‘स्वतंत्रते भगवती' आहेस.
 मी तुला पुन्हा एकवार वंदन करतो. जय हो. जय हो!


०-०-०

लक्षदीप ॥ २९५