पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिणाम आहे. | आज हा हत्तींचा अनाथ आश्रम जगभरच्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केद्र बनला आहे. जो पर्यटक श्रीलंकेला येतो, तो सहसा हा पिनावालाचा अनाथ आश्रम चुकवत नाही. | मी श्रीलंकेला पाऊल ठेवल्यापासून कैंडीचं बुद्धाचा दात असलेलं दंत मंदिर व पिनवाला हत्ती अनाथ आश्रमाबाबत प्रत्येकाकडून ऐकलं होतं. त्यामुळे भल्या पहाटे टॅक्सीनं कोलंबोतून निघालो व सकाळी आठला पोहोचलो. सुट्टीचा दिवस नसूनही सुमारे पाच-सहा हजार पर्यटक जमा झाले होते. । ही सकाळची वेळ त्यांच्या खाण्याची होती. हत्तीपुढे नारळ, जंकफूट, कुंबक आदी झाडांची पाने व विशेष पशुखाद्य ठेवलं होतं तर छोट्या, एक ते तीन वर्षाच्या, हत्तींना बाटलीतून दूध पाजवलं जात होतं. आश्रमाचे प्रशिक्षित कर्मचारी दोन तीन लिटर दुधाच्या मोठ्या बाटल्या सोंड वर केलेल्या हत्तीच्या घशात उपडी करत होते व गटागटा आवाज करीत बाल हत्ती मजेत पीत होते. मीही मग एका हत्तीला जवळ जाऊन दूध पाजलं. त्यावेळची त्याच्या खोल मोठ्या डोळ्यातली तृप्ती पाहून आईने बाळाला दूध पाजल्यावर कशी वात्सल्याची अनुभूती होते, त्याचा प्रत्यय आला. । सकाळच्या खाण्यानंतर दहा ते बारा ही वेळ हत्तींच्या शाही स्नानाची. बांधलेले हत्ती मोकळे केले जातात व एका ओळीत साठ-सत्तर हत्ती मिरवणुकीने जथ्था करून जावे तसे - नदी किनारी निघतात, हेही दृश्य अनोखं व दुर्मीळ. आम्ही सारे पर्यटक त्यांच्या बाजू बाजूने त्यांना साथ देत नदी किनारी अध्य तासाच्या वाटचालीने गेलो. सारे हत्ती शिस्तीत व रांगेत जात होते. ते नदीच्या पाण्यात शिरले व एकमेकांवर पाणी उडवत मनसोक्त खेळू लागले. दोन - तीनशे मीटरच्या क्षेत्रात नारळ व कुंबक अश्व ट्रॉपीकल रेन फॉरेस्टच्या हिरव्याकंच। वृक्षराजीच्या पाश्र्वभूमीवर चमकत्या सूर्य प्रकाशात, खळाळणाच्या लाटेत एका वेळी साठ सत्तर हत्ती जलक्रीडा करताना पाहून डोळ्याचं पारणं फिटलं होतं. त्यांची मस्ती, एकमेकांच्या अंगचटीला जाणं, सोंडेतून पाण्याची भली मोठी लाट सोडणं, पाण्यात लोळत अंग घासणं किंवा शांत पडून राहणं... सुमारे दोन तास ही जलक्रीडा आम्ही अनुभवली व परत हत्तींच्या निवासस्थानी आलो. | आता गाईडसह फिरून एक एक हत्तीची जन्मकहाणी ऐकू लागलो. त्यातून हा अनाथ आश्रम कसा आकारला आला याचं चित्र नजरेसमोर साकारलं. पर्यावरण संवर्धनाचं यापेक्षा अधिक चांगलं उदाहरण शोधूनही सापडणार नाही. | आम्हाला गाईडनं 'राजा' नावाचा दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला हत्ती दाखवला. तो जन्मांध नव्हता, तर शिकाराच्या गोळीनं अंध झाल्याचा कर्मचा-यांचा अंदाज आहे. सुदैवानं राजा त्यांना जंगलात जखमी अवस्थेत मरायला टेकलेला असताना सापडला २९० । लक्षदीप