पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निळं - पिवळे, हिरवं होतं होतं. त्यात एक वेगळंच सौंदर्य जाणवत होतं, तेही डोळ्याचं पारणं फेडणारं होतं! ‘आज धरती बनी है दुल्हन' ही एका फिल्मी गीताची ओळ आठवली. खरंच, हा नायगरा परिसर नववधूप्रमाणे शृंगारला होता. कलात्मकरीतीने अभिरुची संपन्न! | रात्रभर स्वप्नात व बंद डोंळ्याआडहीं नायगराची विविध रूपं आठवत होती. जणू मनोमन फ्लॅशबॅक स्वरूपात पुन्हा पुन्हा नायगरा पहात होतो, अनुभवत होतो. आजच्यासारखी निद्रावस्था क्वचितच सुखद वाटली असेल! मला श्रीमंतीची वा पैशाची कधीच हौस नव्हती व नाहीय. पण नायगराला वाटत होतं; आपल्या खिशात भरभक्कम डॉलर्स असते तर हेलिकॉप्टरनं मी नायगरा परिसर फिरून पाहिला असता आणि उंचावरून लेक एरी (Lake Erie) व लेक ओंटॅरिओ (Lake Ontario) मधील नायगरा नदी व धबधबा पहिला असता... | खरं तर, केवळ नायगरा धबधबाच नाही तर ‘दि ग्रेट लेक सिस्टीम' या नावानं ख्यातप्राप्त असलेला परिसर हे एक महान नैसर्गिक आश्चर्य आहे. त्याचा भूगोल व माहिती अत्यंत आश्चर्यकारक आहे. खरं तर, नायगरा नदी ही ख-या अर्थाने नदी नाही. तशी ती तुलनात्मकरीत्या छोटा पाण्याचा प्रवाह आहे, जो दोन मोठ्या तळ्यांना जोडतो. ही तळी म्हणजे 'लेक एरी' व 'लेक ओंटॅरिओ'. लेक एरी ह्या गोड्या (फ्रेश) पाण्याच्या तळ्याचा परिसर सुमारे दहा मैलाचा आहे, त्याची लांबी २४१ मैल तर रुंदी ५७ मैल असून २१० फुटांपर्यंत त्याची खोली आहे. लेक ओंटॅरिओ ७५४० मैल परिसरात पसरलेला त्याची लांबी १९३ मैल व रुंदी ५३ मैल आहे. हे तळे एरीपेक्षी जास्त खोल आहे. त्याची महत्तम खोली ७७४ फूट आहे. ही दोन तळी आणखी अशीच तीन महाप्रचंड तळी 'लेक सुपेरिअर', 'लेक हुरून’ (Huron) व 'लेक मिशिगन' मिळून एक महान नैसर्गिक आश्चर्य म्हणून म्हणता येईल असा ‘दि ग्रेट लेक सिस्टिम' हा जलप्रवाह (Mass of Water) तयार झाला आहे. ही तीन तळी तर एरी व ओटॅरिओपेक्षाही प्रचंड मोठी आहेत. जगाचं एक पंचमांश गोडं 'फ्रेश' पाणी या ‘दि ग्रेट लेक सिस्टीम' मध्ये साठवलं आहे, एवढं नमूद केलं तरी पुरेसं आहे. । वर मी लिहिलं आहे की, शब्दातून, वाणीतून किंवा छायाचित्रातून नायगरा धबधबा ख-या अर्थाने जाणवणार नाही. तो प्रत्यक्ष पाहून अनुभवायलाच हवा. तसंच काहीसं ‘दि ग्रेट लेक सिस्टिम' चं म्हणता येईल. ही पांच महाप्रचंड तळी कशी पाहायची? त्यांचा प्रचंडपणा कसा अनुभवायचा? त्यासाठी हेलिकॉप्टरच हवं, पणा - जेब जितनी चाहिये थी, भरी नहीं थी. मला माझ्या एका मंत्र्याचा काही वर्षे निजी सचिव असलेल्या अधिकारी मित्राचं लक्षदीप ॥ २८७