पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व उंच उठणाच्या तुषारकरणरूपी धुक्यामधून दोन्ही बाजूला धनुष्याप्रमाणे ताणत साकार झालं होतं. ते इंद्रधनुष्याचे सप्तरंग, धबधब्याच्या पाण्याचे शुभ्रफेनिल धवलकण, खाली खळाळणाच्या नायगरा नदीचं व काचेच्या ऑब्झर्वेशन टॉवरचं पाचूच्या रंगाचं देखणं दिमाखदार हिरवेपणा ल्यालेला रंग... वाटलं, जर कधी नायगराला बालकवी आले असते तर ‘फुलराणीलाही मागे सारणारी अप्रतिम निसर्ग कविता त्यांनी लिहिली असती. मी पडलो गद्यलेखक, त्यामुळे ‘दि व्हाईस ऑफ गॉड' ही नायगरावर कविता लिहिणा-या विलीस गेलॉर्ड क्लार्कच्या कवितेच्या ओळी त्या सौंदर्याची अनुभूती आत्म्यापर्यंत उतरावी म्हणून गुणगुणत राहीलो.
 "These groaning rocks the Almighty's finger piled,
 For ages here his painted bow has smiled,
 Mocking the changes and the chance of time,
 Eternal, beautiful, screne, sublime!"
 "आय सॅल्यूट यू मि. क्लार्क! तुम्ही आमच्या बालकवीचे सख्खे भाऊ शोभता. किती वेचक शब्दात नायगराचं सौदर्य तुम्ही शब्दबद्ध केलं आहे. Smiling painted bow.... अर्थात, स्मितहास्य करणारं इंद्रधनुष्य.. सिंपली ग्रेट!' मी मनोमन त्या शब्दप्रभूला नमन केलं!
 दर पंधरा मिनिटाला एक ‘मेड ऑफ द मिस्ट’ बोट दोन्ही देशांच्या किना-यावरून सुटते. आम्ही परतत असताना दोन बोटी नदीमध्ये जाताना दिसल्या. साच्या पर्यटकांच्या अंगावर निळा प्लास्टिकचा गाऊन... बोटीवर निळाई जणू पसरलेली. हिरव्या चमकत्या पाण्यावर तरंगत जाणारी निळी झालेली बोट आणि वर स्वच्छ निळं आकाश... मागे मागे जाणारा नायगरा धबधबा व त्याचं शुभ्रफेनिल पाणी.. अजूनही त्यावर पडलेलं इंद्रधनुष्य कायम होतं.. आसमंतावर सायंकाळ पसरत होती. आम्ही तृप्त होऊन मुक्तपणे परतत होतो.
 पुन्हा गाईड सोबतीला होता. कॉफी घेत संभाषण चालू होतं. गाईडनं ‘मेड ऑफ द मिस्ट' ची रोमांचक कहाणी सांगितली आणि नायगराच्या सौदर्याला रहस्य व रोमांचाची ऊब मिळाली, आणि मनातला नायगरा अधिकच रसीला होत गेला!
 "कोणे एके काळी या पृथ्वीतलावरील माणसे निसर्गाशी एकरूप होती. ती धरती, आकाश, चंद्र, सूर्य, ता-यांशी बोलत होती. त्यांच्यासाठी पशू, पक्षी व वृक्षसंपदा बंधू-भगिनी व सगे सोययाप्रमाणे होती. 'थंडर' या नावाने ओळखली जाणारी, जण देवदताप्रमाणे असलेली जमात माणसांना एकात्मता सांगत होती. काय होतंय व काय होणार आहे हेही सांगत होती.

 “पण माणसाची जात कृतघ्न. ती हळूहळू विसरत होती. पथ्वी, आकाश, सूर्य, तारे व प्राणी माणसांशी अजूनही संभाषण करायची. पण माणसांची कर्णेद्रिये जणू

२८४ । लक्षदीप