पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि भारतात दोन महिन्यांनी परतल्यावर टेक्नीकलर मधील ‘मुघले आझम' मधील रंगीत मधुबाला पाहाताना प्रत्ययास येणार होतं! (नायगरा त्याच दिवशी रात्री रंगीन स्वरूपात पाहिला व भारतात आल्यावर पहिलं काम केले पुण्याला 'ई - स्कवेअर मध्ये जाऊन 'मुघले आझम' पहाण्याचं, दोन्ही अनुभव रंगसंपृक्त. श्रीमंत. नजरेचं सार्थक करणारे, अविस्मरणीय)
 चढत्या क्रमानं धबधब्याची रुंदी, भव्यता, पाण्याचे लोट व तेवढ्याच पटीनं सौंदर्य न्याहाळलं! वीस मिनिटांचा हा बोटीचा प्रवास एका अप्रतिम लावण्याचे सर्वांग सुंदर, विविध कोनातून दर्शन घडविणारा होता! नायगरा हा अमेरिकन्स व कॅनेडियनचा आवडता 'हनीमुन स्पॉट' आहे. 'Love in the mist of Niagara falls' अशी जी जाहिरात केली जाते, ती इथं सार्थ वाटते! “What could be more dramatic and romantic than having the majestic Niagara as the bafkground for your wedding or honey moon?'
 ही माहिती पुस्तिकेतली जाहिरातीची ओळ मी नंतर परतल्यावर अंजूला दाखवली व म्हटलं,
 "आपल्या लग्नाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. एका अर्थानं आपली ही सिल्व्हर ज्युबिली ट्रिपच आहे..."
 खरंच, आपल्या लग्नाला पंचवीस वर्षे झाली असली तरी नायगरा आमच्यातला रोमॅटिक' मुड जागृत करीत होता. तर मग प्रेमकुंजन करणारे प्रेमीजन वा नवविवाहित किती मदभरे होत असतील?
 आमच्या रसिक मित्रानं म्हटलं, 'वेळ असेल तर जाऊ या आपण इथल्या ‘ए रोमँटिक वेडिंग चॅपेल' किंवा 'दि फॉल्स् वेडिंग चॅपेल' ला? ही दोन् हॉटेल्स आहेत, जिथं विवाह सोहळा संपन्न होतो व हॉटेलवाले हनीमूनची जय्यत तयारी करून देतात. अगदी हेलिकॉप्टर वा बलूनने उंचावरून नवविवाहित प्रेमी नायगरा पाहात रोमान्स करू शकतात!" त्याच्या उत्साहाला आवरत आम्ही नको म्हटलं. कारण तिथं जाऊन अमेरिकन पद्धतीचा विवाह सोहळा पाहाण्यापेक्षा तेवढा वेळ नायगराचं सौंदर्य डोळ्यांनी पिण्यात व मनातल्या रोमान्सने रोमांचित होणं जास्त फायद्याचं होतं!

 धबधब्याखालची नदी अमेरिकन व कॅनडा देशाच्या समाईक मालकीची. इथं नदीतून व्हिसा न घेता पाण्यातून पलीकडच्या किना-यापर्यंत बोटीनं जाण्याची मुभा होती, पण जमिनीवर पाऊल टाकणं शक्य नव्हतं. अर्थात अमेरिकन माणसाला व्हिसा लागत नाही कॅनडात जायला, पण किमानपक्षी पासपोर्ट हवा. तर आम्ही 'हॉर्स शू फॉल' पाहाण्यासाठी पाण्यातून कॅनडा हद्दीत प्रवेश केला आणि भिजत, अक्षरश: चिंब होत धबधबा पाहिला. आणि आमचं नशीब सिकंदर की, चक्क ऊन पडल्यामुळे विलोभनीय असं इंद्रधनुष्य त्यावेळी निर्माण झालेलं पाहिलं. ते धबधब्याचा छेद करीत

लक्षदीप ॥ २८३