पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जर असेल तर, त्याचा आवाज यापेक्षा काही वेगळा असणार नाही असं क्षणभर वाटलं!
 आता आम्ही रांगेतून ‘मेड ऑफ दि मिस्ट' बोटीच्या प्रवासासाठी टॉवरमधील लिफ्ट मध्ये शिरलो. ती आम्हाला धबधब्याच्या पायथ्याशी नदीमध्ये घेऊन जाणार होती. सुमारे दहा ते पंधरा मजले खोल. आमचा लिप्टमन एक हसच्या डोळ्याचा निग्रो होता. आम्हाला त्यानं 'आई'ये असं हिंदीत म्हणत स्वागत केले. तो बहुभाषी असावा. कारण तो जपानी, मेक्सिकन इत्यादीचेही त्यांच्या भाषेतील अभिवादनाचे शब्द उच्चारीत त्यांचे स्वागत करीत होता! लिप्ट चालवणे हा त्याचा रोजचा व्यवसाय, पण किती प्रसन्नपणे काम करीत प्रवाशांना सुखावह ट्रीटमेंट देत होता. पर्यटन स्थळाचा आनंद अशा छोट्या छोट्या बाबींनी द्विगुणित होतो.
 लिफ्ट थांबली. आम्ही बाहेर आलो. इथून नदी संथ होत धावत होती. किनारी धक्क्यावर पीअरवर एक तीन मजली बोट लागली होती. तीच सुप्रसिद्ध 'मेड ऑफ दि मिस्ट' बोट होय. धबधब्याजवळून जाताना उडणा-या पाण्याने अंग भिजू नये म्हणून प्रत्येकाला निळ्या रंगाचा प्लास्टिकचा ओव्हरकोट म्हणा वा गाऊन म्हणा, दिला जात होता. तो घालताना लहान मुलांप्रमाणे निर्मळ निर्हेतुक हसू येत होतं! अंजूला तो निळा पोषाख छान दिसत होता. मी त्या ड्रेसमधल्या तिला कॅमे-यात बंदिस्त केलं!
 आम्ही बोटीवर कठड्याला रेलून उभे होतो. हातात कॅमेरा सज्ज होता. आणि बोट सुरू झाली. ती आम्हास तीनही धबधब्यांच्या जितकं जवळ जाता येणे शक्य होतं तितक्या जवळ घेऊन जाणार होती व तिन्ही धबधबे या टोकापासून त्या टोकापर्यंत दर्शविणार हेती. बोटीवर रेकॉर्डेड कॉमेंटरी ऐकवली जात होती.

 प्रथम अमेरिकन फॉल, मग ब्रायडल व्हेल फॉल आणि शेवट सर्वात मोठा, महत्त्वाचा व भव्यतेचा कळस गाठलेला हॉर्स शू फॉल (कॅनेडियन फॉल) पाहाताना काही क्षण मूक होऊन तो निसर्गाचा चमत्कार पाहात होतो. मनात त्याचं सौंदर्य साठवीत होतो, तर मध्येच वाचेला न राहावून कंठ फुटत होता, व नायगरा फॉल किती सुंदर आहे, किती फैटस्टिक आहे, असं ठरावीक शब्द वापरून सांगायचा मोह आवरत नव्हता. 'विस्मयचकित होणं', ‘आ वासणं', 'थक्क हो अवनीय आनंदानं मन भरून येणं' हे एरवी वापरले जाणारे शब्दप्रयोगही किती अपरे आहेत. से जाणवत होतं. त्या पलीकडे प्रतीत होणारं आम्ही अनुभवत होतो. सर्वांगाला डोळे जणू फुटले आहेत, असं काहीसं वाटत होतं. यापूर्वी हा अदभत आरसपानी सौंदर्याचा अनुभव मधुबाला रुपेरी पडद्यावर पहाताना आला होता. आता तो सप्तरंगात पाहायला लवकरच मिळणार होता. मुघले आझम' हा सिनेमा येत्या दिवाळीला रंगीन होऊन प्रकाशित होणार होता. त्याची आठवण झाली. शुभ्र आरसपानी सौंदर्य रंगीत स्वरूपात कसं अवतरणार, हे आज रात्री नायगराची रोशणाई पाहाताना अनुभवता येणार होतं.

२८२