पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२. नायगरा : दि व्हॉईस ऑफ गॉड


 "हा वाट दर जाते स्वप्नामधील गांवा..."
 नॉर्थ - ८१ या अमेरिकेच्या सर्वात लांब असलेल्या प्रशस्त व गुळगुळीत महामार्गावरून आमची कार ताशी शंभर किलोमीटर या वेगानं पोटातलं पाणी न ढळता धावत होती. मागील पंधरवड्यापासून न्यूयॉर्क राज्यातला प्रसिद्ध असणारा 'फॉल' - ‘पानगळी' चा मौसम सुरू झाला होता. प्रत्यक्ष पानगळीला अवकाश होता, पण पानांचे बदलते रंग अफलातून जादूई करिश्मा दाखवत अक्षरशः सप्तरंगांची उधळण करीत होते! हिरवे, नारंगी, लालगर्द, पिवळे, निळे व काही प्रमाणात पोपटी रंगाची पाने अंगाखांद्यावर वागवीत दुतर्फा झाडे व झुडपे नजर बांधून ठेवीत होती. निसर्ग पूर्ण जल्लोषात आपली रंगपंचमी खेळत होता व पाहणा-यांचे डोळे, नजर व मन सप्तरंगांची उधळण करीत आकंठ भिजवीत होता!
 आज हवाही मोठी छान होती. अमेरिकेमध्ये हवेचं भारी कोडकौतुक. ज्या दिवशी स्वच्छ ऊन पडतं आणि थंडी कमी होते, तो दिवस अमेरिकेन माणूस रसिकतेनं भोगायला सदैव उत्सुक असतो. कारण वर्षाचे सहा ते आठ महिने शून्याच्या खाली तापमान, हाडं गोठवणारी थंडी व करडे, बर्फाळलेलं वातावरण असतं; त्यामुळे सूर्यप्रकाशाचे दिवस त्यांच्यासाठी दिलासा घेऊन येणारे असतात. त्यामुळे आजचा दिवस मोठा छान होता. छानपैकी स्वच्छ चकाकतं ऊन पडलं होतं आणि बोचरी थंडी अगदीच गुलाबी - भोगी थंडीत नाही तरी - सुसह्य आनंदी थंडीत परावर्तित झाली होती. आमचा अमेरिकेत न्यूजर्सीला राहणारा मूळचा भारतीय मित्र, जो खरा आम्हाला नायगरा दाखवण्यासाठी आला होता, त्याच्या कारनं आम्ही नायगराकडे जात होतो, तो म्हणाला,
 ‘यू आर लकी! मागच्या महिन्यात मी आलो होतो, तेव्हा धुकं होतं. नायगरा पाहायची सारी मजा किरकिरी झाली. आज मात्र असं होणार नाही. यू विल गेट ए फैटॅस्टिक व्ह्यू ऑफ नायगरा फॉल..!"

 "तथास्तु!" मनोमन ती म्हणालो, आणि मनाचा हा विश्वास खरा ठरणार याची

लक्षदीप २७७