पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खचितच अपौरुषेय आहे - माणसानं निर्माण न केलेली, तर नैसर्गिक प्रक्रियेतून साकारलेली. जगाचं माहीत नाही, पण भारतात तरी एकमेवद्वितीय, केवळ अद्भुत, फैन्टॅस्टिक. या एका स्थळानं माझ्यातला भटका प्रवासी कितीतरी अनुभव व कलाश्रीमंत झाला होता!
 वर आभाळात स्वच्छ ऊन झळाळत होतं. थोडा उत्साह जाणवत होता. पावसाची कोणतीही चिन्हं दिसत नव्हती. एकदम म्हणावंसं वाटलं, “सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?"
 आता मला पाऊस हवा होता. चेरापुंजीला येऊन पाऊस अनुभवायचा नाही, तर काय अनुभवायचं? त्यामुळे निरभ्र निळेशार आकाश पाहून मन निराशलं होतं!
 “सर, आशा सोडू नका. इथं केव्हाही पाऊस पडू शकतो...' जेटस्टारचे हे शब्द दिलासा देत होते. मला आज पाऊस अनुभवायचा होता.... चेरापुंजीला पावसात भिजायचं होतं. क्या लिखा है मेरे नसीब में?
 अचानक दार्जिलिंग भेटीतले कलेक्टर डॉ. आफताबचे शब्द आठवले “इथं टायगर हिल्सवरून काचनगंगाचे विहंगम दृश्य दिसतं. पण त्यासाठी नशीब सिकंदर हवं. ढगाळ वातावरणामुळे अनेकदा हे दिसत नाही. असं म्हटलं जातं की, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर दार्जिलिंगला एकूण सातवेळा आले, पण एकदाही त्यांना कांचनगंगा शिखराचं झळाळतं हिमदर्शन झालं नाही...."
 इथं चेरापंजीला आज मला पाऊस भेटेल काय? चिंब भिजत येईल का? सायंकाळी परतायचं आहे. थांबता येणार नाही. आणखी दोन-अडीच तास. आहेत. तोवर पाऊस मेहरबान होईल का? म्हणून बालकासारखा प्रश्न - “सांग साग भोलानाथ, पाऊस पडेल काय?"
 हे खरंच आहे की, भारत हा प्राचीन देश आहे व इथली सांस्कृतिक परंपरा कुणालाही हेवा वाटावी इतकी समृद्ध व वैविध्याने नटलेली आहे. त्यामुळे दंतकथाना तोटा नाही. अशीच एक दंतकथा आता अनुभवायची होती. पाहायची होती.
 आमचा पुढला टप्पा होता. - ‘कोह रामहाह’ - हे स्थळ म्हणजे शंकू आकृताच पिशवीसारखं दगडाचं प्रचंड आकारमान. त्याला एक छानपैकी दंतकथा चिकटलेला.
 कोह रामहाह म्हणजे चेरापुंजीचं एक आकर्षण आहे. जिथं डोंगर संपतो व खाले दरी व त्याला लागून विस्तीर्ण समतल भूभाग सुरू होतो, तेथे डोंगराच्या कडेला प्रचंड आकारमानाचा दगड आहे. एक मोठी बास्केट (पिशवी) - लांव, रुंद, खाले वरच्या बाजला शंकाकृती सुळका. जणू पिशवी उचलण्यासाठी असलेला बंदच. " धरून राक्षस ही दगडाची पिशवी उचलू शकतील!
 तो प्रचंड दगडाचा सुळका पाहताना डोळे विस्फारले गेले.

 त्याच्या भोवती खासी जमातीची दंतकथा गुंफली गेली आहे. ती मनोवेधक

२७४ । लक्षदीप