पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोसळतात. त्यांचा तो आवाज अनादी, अपौरुष अशा वेदमंत्राप्रमाणं वाटतो आणि मनात निसर्गाविषयी पूज्यभाव निर्माण करतो.
 तीन बाजूंनी उंच बोडके डोंगर व खोल-हजार-दीड हजार-फुटाची विस्तीर्ण दरी, छोट्या-बुटक्या झुडपांनी काळसर छटा असणारा हिरव्या रंगाचा साज चढवलेला. आणि तो शुभ्र नितळ पाण्याचा ‘द नोह कलीकाई' धबधबा...
 गरम चहाचे घुटके घेत मी किती वेळ तरी तो धबधबा आणि डोंगरदन्याचा आसमंत निरखीत राहतो. कानात जेटस्टारनं धबधब्याची सांगितलेली करुण कहाणी पुन्हा पुन्हा प्रतिध्वनित होतेय...
 कलिकाई नावाची एक खासी स्त्री कुटुंबप्रमुख व ‘ब्रेड अर्नर'. ती काम करणारी, तर तिचा नवरा घर सांभाळणारा व मुलांकडे पाहणारा. एक दिवस कलिकाई कामावरून घरी येते, तेव्हा तिचा नवरा प्रेमानं स्वागत करीत म्हणतो, “ये दमून आलीस. तुझ्यासाठी खास गरमागरम कढी केलीय." ती कढीचा स्वाद घेऊ लागते, अचानक त्यात तिला एक छोटी मानवी करंगळी (बोट) सापडते. ती दचकते व काहीशी भयभीत होते. आजूबाजूला पाहते. तिचा लाडका मुलगा दिसत नाही, तिचा हा दुसरा नवरा ज्याचा सावत्र मूल म्हणून नेहमी रागराग करायचा, ती त्याच्याबद्दल खोदून खोदून विचारते. तेव्हा तो अपराध कबूल करीत कबुली देतो की, “मला त्याचा राग होता, म्हणून मी त्याला मारलं. त्याचे तुकडे - तुकडे केले. व त्याच्या मांसाची ही करी - डिश बनवली. त्यात चुकून करंगळी राहून गेली..." आपण जे अन्न भक्षण केलं, ते आपल्या पोटच्या गोळ्याला मारून त्याच्या मांसापासून बनवलेलं होतं, हे जाणवताच ती बेभान झाली. नव-याला दूषणं देत छाती बडवू लागली व ओक्साबोक्शा रडू लागली. त्या शोकात ती घरातून बाहेर आली, सैरावैरा धावत सुटली. आणि शोक असह्य झाल्यामुळे जेथून धबधबा सुरू होतो, तेथून तिनं खाली खोल दरीत, पाण्याच्या प्रवाहात स्वत:चा देह झोकून दिला व शेवट करून घेतला. ‘नोह' म्हणजे उडी मारणे, त्याला तिचं नाव जोडून या धबधब्याचं तेव्हा ‘सून खासी' भाषेत ‘नोह कलीकाई' अस नाव पडलं.
 ही मानवी क्रौयाची परिसीमा गाठणारी पाशवी वृत्ती. त्याच्या जोडीला मातेचा असीम ममता व पुत्रवियोगानं जीवन झुगारून देण्याची स्त्री प्रवृत्ती. त्याची या अताव संदर पर्यटन स्थळाशी कशी सांगड घालायची? करुण गीतं सुंदर वाटतात, अस ज होलीनं म्हटलंय, ते वेगळ्या अर्थानं इथं खरं वाटतंय. हा सुंदर परिसर या भयानक कहाणीच्या पाश्र्वभूमीवर भीषण सुंदर वाटतोय.

 आमची टॅक्सी आता ‘मॅक्समाई’ लेणीकडे धावत होती आणि जेटस्टारच्या रसवंतीला बहर आला होता. काल शिलाँगला मेघालयाचे राज्यपालही या लेण्यांबद्दल मन:पूर्वक बोलले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच केव्हजमध्ये सोडियम व्हेपर लॅम्पचे दिवे

२७२ लक्षदीप