पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कला मोठी, की त्याचं समाजाच्या नीतिनियमाच्या चौकटीत वागणं? प्रेरणा : अर्थात कलाच मोठी भाईजान... कारण ती इतरांचं मन समृद्ध, सुजाणकरते... प्रतिभा : पण त्या कलावंताला आणि त्याच्याशी बांधल्या गेलेल्यांना मात्र वेदनेचा जळता निखाराच आजन्म पदरी बाळगावा लागतो. अब्बास : (विचारपूर्वक) गुरूमध्ये एक प्रकारची व्हिक्टिमहूड प्रवृत्ती होती; त्यामुळे त्याला कधी तू कारण असणार, कधी प्रेरणा, कधी इंडस्ट्री, तर कधी प्रेक्षक... ज्यांनी त्याचा क्लासिक सिनेमा नाकारला. (दोघी त्याच्याकडे शून्य नजरेनं पाहात आहेत) गुरूला जाणण्याचा जन्मभराचा ध्यास संपत नाही हेच खरं... मेरी जहन में आज भी गुरू की आखरी रात जिंदा हैं... उसे भूल नहीं सकता... रहनेको सदा दहारमें आता नहीं कोई तुम जैसे गये जैसा जाता नहीं कोई एक बार खुद मौतभी घबरा गई होगी। यूँ मौत को सीनेसे लगाता नहीं कोई । डरता हूँ कही खुश्क न हो जाय समुंद राख अपनी कोई आप बहाता नहीं कोई साकी से गिला था तुम्ही मयखानेसे शिकवा अब झहरेसे भी प्यास बुझाता नहीं कोई माना की उजालोंने तुम्हे दाग दिये थे। बेरात ढले शमी बुझाती नहीं कोई (हळूहळू प्रकाश कमी होत जातो. गुरूवर प्रकाश येत जातो.) | गुरू : ये निद्रे, ये. गेले तीन दिवस... तीन रात्री तुझी आराधना केल्यावर आता कुठे माझ्यावर प्रसन्न होत आहेस. (ग्लास पाहात वे घोट घेत) तेही या व्हिस्की कांपोजच्या गोळ्यांच्या कॉकटेलच्या संगतीत. वा निद्रादेवी, तूही या गुरूप्रमाणे नशाबाज निघाली (खदखदून हसत) वा.. क्या बात है... क्या बात है? काय चमकदार कल्पना आहे.. आता. या क्षणी अब्बास हवा होता जवळ, त्यानं ही कल्पना टिपून घेतली असती आणि कुठेतरी लेखनात त्याचा वापर केला असता... (दीर्घ सुस्कारा) अब्बास, मेरे यार, वादा करके भी अबतक नही आया तू... (घड्याळ पाहात) सुबह होने को बस, कुछ पलों की देरी है... यार, तुझ्याविना इथं मी क्षणभरही समाधानानं जगू शकलो नाही. तिथं त्यो जहन्नुमध्ये कसा जगेन? (विचित्र कडवट हास्य) जहनुम आणि जन्नत, आजवर कधी विचार केला नाही. पण या अस्वस्थ धुमसणाच्या छळवादी गुरूला का जन्नत मिळेल? या उण्यापुच्या लक्षदीप ।। २६५