पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वत: तडफडायचं आणि इतरांनाही. आय कान्ट लिव्ह विथ यू इन सच सरकम्स्टन्सेस गुरू. गुरू : (धक्का बसल्याप्रमाणे) तू... तूही मला सोडून जाणार? प्रेरणा : हो. कायमचं. आणि आता हा निर्णयही शेवटचाच. गुरू : इतकं पण प्रखर व्यक्तिमत्त्व असू नये माणसाचं... स्वत:बरोबर इतरांनाही । घायाळ करणारं. प्रेरणा : (हसत) जाऊ दे गुरू... बात निकली तो दूर तक निकल आयेगी. मी आज ना उद्या जाणार हे नक्की. पिक्चर धडपणे करणार असशील तर तोवर थांबेन, पण नो फर्दर. गुरू : माझ्यात तुला रोखायचं सामर्थ्य नाही. पण तू गेलीस तर मी फार काळ | नसेन प्रेरणा. प्रेरणा : तुला मरणाचं बोलायला आवडतं. पण मलाही कुठे जगण्यात स्वारस्य उरलंय? (किंचित हसते. मग विचारपूर्वक) किंवा असं पण होईल. तू एकटेपणामुळे कणखर पण होशील. आज मी प्रतिभाला वचनातून मुक्त । केलंय. तिला आपलं कर. मी केव्हाही घटस्फोटाच्या कागदावर सही करायला तयार आहे. बस, एकच कर, माझ्यासाठी तुझ्यातल्या देवदासला मार. हॅम्लेटला हद्दपार कर. तरच जगू शकशील, सिनेमा करू शकशील. गॉड ब्लेस यू... बाय. (हुंदका देत निघून जाते.) | (अंधार) । प्रतिभा : (प्रेरणेकडे पाहत) मी गुरूला माझ्या आयुष्यातून वेगळं केलं ते तुला | दिलेलं वचन पाळण्यासाठी, पण तू का सोडलंस त्याला? प्रेरणा : त्यानं जगावं म्हणून. त्याला मी तुझ्याशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता. आणि डिवोर्सची तयारीसुद्धा दाखवली होती. प्रतिभा : (धक्का बसून) काय? तुझ्याशिवाय माझ्यासंगतीत तो क्षणभरही स्वस्थ जगू शकला नसता. गुरूच्या सान्निध्यात मी स्वत:ला प्रेरणेच्या रूपात बसवायचा प्रयत्न करीत होते. कदाचित तुही त्याला बांधून ठेवण्यासाठी प्रतिभा व्हायचा प्रयत्न केला असशील... यामुळे गुरू दुभंगत होत केला असं मला कधीकधी वाटतं. अब्बास : आदर्श असणं.. आदर्श जगणं हे समाजासाठी नेहमीच हितकारक असतं, पण माणसाचं मन चंचल असतं.. विशेष करून कलावंतांचं. त्याला या नीतिनियमात नेहमीच बांधून ठेवता येत नाही... तसा प्रयत्न झाला किंवा केला तर कदाचित तो माणूस म्हणून चांगला ठरेलही. पण कलावंत म्हणून त्याची गळचेपी होईल... सवाल मग हा पैदा होतो की, कलावंतासाठी २६४ । लक्षदीप