पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होतेय प्रतिभा,... एक माणूस म्हणून कोलमडून पडलो असताना कलावंत म्हणून कसा उभारी घेऊ? प्रतिभा : सांग... मी काय करू म्हणजे तुझी ही कन्फ्युजन संपेल... तुझ्यातल्या | कलावंत बळ मिळेल? गुरू : मी पुन्हा तुला हे सांगायला हवं? प्रतिभा : (धक्का बसून) गुरू... जे शक्य नाही... जे निव्वळ अशक्य आहे. त्याचीच का इच्छा धरतो आहेस? शक्य नाही... गुरू : का, प्रतिभा का? ... मी आजही तेवढ्यात उत्कटतेने तुझ्यावर प्रेम करतो... प्रतिभा : मी नाही करीत?... तरीही हे शक्य नाही... प्रेरणाशी प्रतारणा करीत आणि स्वत:च स्त्रीत्व अपमानित करीत विदी मनानं छिन्न- भिन्न अवस्थेत कशी मी तुझ्याशी एकरूप होऊ? खच्या प्रेमात मनाची एकरूपता पुरेशी नाही?... त्यात शरीरमाध्यमातून वासनेचा अंश का ओतायचा? मी आता त्या अवस्थेपलीकडे गेले आहे. (हुंदका) मला बोलवत नाही गुरू... मी जाते... पिक्चर करणार असशील तर अर्ध्या रात्री मी येईन, नाही तर खुदा हाफीज... (आवेगाने निघून जाते अंधार) | (पुन्हा प्रकाश येतो तेव्हा गुरू आणि प्रेरणा रंगमंचावर) । गुरू : मी हा सिनेमाच बंद करून टाकतोय. तुम्हाला भेटीचं कारण नको. प्रेरणा : असं मला, प्रतिभा आणि अब्बास भाईजानला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. ही फिल्म न करणं हा सर्वस्वी तुझा निर्णय असणार आहे गुरू. गुरू : मला समजतंच नाही प्रेरणा, मी असा का वागतोय ते. प्रेरणा : कारण अगदी लहानपणापासून दुःख कुरवाळत, मनाला लहान- सहान बाबींवर घायाळ करीत जगायची सवय लागली आहे गुरू तुला.. त्याचा तू कलेसाठी मोठ्या ताकदीनं उपयोगही करून घेतला आहेस. पण त्याचं रूपांतर आता ऑब्सेशनमध्ये झालं आहे... त्यामुळे असा ठायीठायी अडखळतो आहेत...। गुरू : (कडवट स्वर... उपहासाने हसत) किती व्यवस्थितपणे तू काय, प्रतिभा काय किंवा हा आमचा परममित्र अब्बास काय... माझ्या मनाचं सुंदर पोस्टमार्टेम करता... आता एकदा तिघे एकत्र बसून त्याचा छानपैकी अहवाल तयार करा. फ्राईडनंतर तुमचंच नाव सायकिआट्रीत अजरामर होईल... बँक्स ए लॉट.. तुम्ही सगळ्यांनी मलाच माझ्यासमोर नग्न उभं केल्याबद्दल... प्रेरणा : तुला ठामपणे निर्णय कुठं घेतो येतो? तू देवदास - हॅम्लेटच्या जातकुळीचा... लक्षदीप ॥ २६३