पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुला मी जीनिअस कलावंत म्हणत आलोय ते सगळं खोटं समजायचं? गुरू : महापुरुषांना देवत्व बहाल करून, त्यांचे देव्हारे उभारून, पुतळे करून त्यांची माणूस म्हणून हत्या करायची, हा समाजाचा जुना रीतीरिवाज आहे... अब्बास, तूही माझ्यातल्या माणसाकडे साफ दुर्लक्ष करणार आहेस?... माणूस म्हणून मीही स्वार्थी... भेकड, आप्पलपोटा थोडाफार असेन, नव्हे आहेच. माझे पायही मातीचे आहेत... एक पुरुष म्हणून मीही इगोइस्टिक आहे. भ्रमरवृत्तीचा आणि शिकारीप्रवृत्तीचा पण असेन... माझ्या वासना, माझ्या वृत्ती या माझ्या आहेत, माझ्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य घटक आहेत, आणि मी माझ्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे जगतोय, तो माझा अधिकार नाही? अब्बास : फार कठीण सवाल आहे गुरू. ह्याचं उत्तर मला पूर्णपणे नाही माहीत. पण माणसे मर्त्य असतात, कला अमर असते हेच सत्य आहे.. शो मस्ट गो ऑन अॅट एनी कॉस्ट... मी तुझा कलावंत म्हणून मृत्यू होणार असेल तर नाही सहन करू शकत. (अब्बास निघून जातो) गुरू : तू म्हणतोयस तेही खरं आहे अब्बास. आता मला हे लख्खपणे जाणवतंय की, माझ्याच मनोरचनेचा हा दोष आहे. त्यात दुर्बलता, परावलंबीपणा, आत्मकेंद्रितपणा हीच तत्त्वं मिसळली आहेत. का म्हणून मीच एकट्यानं कलावंत असण्याची प्रिव्हिलेजेस मागावीत? अब्बाससुद्धा एक समर्थ कलाकार आहे. पण तो कुठे डिमांडिंग आहे? प्रेरणा आणि प्रतिभासुद्धा ह्या सिनेमाच्या निमित्तानं परत आल्याच की माझ्याकडे? मग मीच का असा दुभंगतोय? दोन्ही डगरी सांभाळतांना माझाच का तोल जातोय? | (प्रतिभा रंगमंचावर प्रवेश करते.) प्रतिभा : गुरू... काय ऐकतेय मी हे? आता तूच माघार घेत आहेस? गुरू : तू काय... प्रेरणा काय, तुम्ही समर्थ आहात.. कणखर आहात. मी मात्र फार दुबळा आहे.. प्रतिभा : हा दुबळेपणा आपणच कमी करायचा असतो. मनाशी निश्चय करून कामात स्वत:ला झोकून दिलं की आपला कमकुवतपणा कमी होतो, हा माझा अनुभव आहे. तुझ्यापासून वेगळी झाल्यानंतर भीती आणि दडपण ह्यावर मात करत मी हा रोल करतेय. आता हा पिक्चर तू पूर्ण करायला हवास गुरू. माझ्यासाठी. भले या पिक्चरनंतर मला एकही सिनेमा नाही मिळाला तरी चालेल. पण गुरू, माझा असा सूड घेऊ नकोस... हा पिक्चर अर्धवट सोडू नकोस... गरू: तुझ्या या अशा अपेक्षांनी माझं दडपण वाढतयं... माझी बेचैनी धारदार २६२ । लक्षदीप