पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मा . स्पर्शही करू देत नाहीस? का? प्रतिभा : एकदा जे संपवलं ते नातं मला पुन्हा नाही जोडायचं. खूप त्रास होईल मला. खूप. गुरू : म्हणजेच अजूनही तू मला माणूस म्हणून माफ केलं नाहीस प्रतिभा... बस, अब्बास के खातीर तू फिल्म कर रही है. प्रतिभा : मला खरं तर हे बोलायचं नाहीय, पण आता बोलते. गुरू, अरे कधी तरी स्वत: पलीकडे पाहायला शीक. कलावंताला इगो हुवा, पण हे अती होतंय. तुला दु:ख होतं, तुला वेदना होतात. तू खूप हळवा आहेस... कबूल.. पण मीही पत्थरदिल नाही... मीही स्वत:ला सावरते आणि भावना प्रकट करत नाही. तुझ्यापासून दूर होणं मलाही सोपं नव्हतं, नाहीय. पण तरीही तुझा हा क्लासिक ठरणारा सिनेमा मनावर धोंडा ठेवून करतेय ते तुझ्यातल्या कलावंताला आजही तेवढीच निस्सीम पूजते म्हणून. पण - म्हणून... गुरू : पण म्हणून माझ्यातल्या अप्पलपोट्या आणि आत्मकेंद्री माणसाला का माफ करावं असंच ना?... खरं तर शूटींगचे गेले आठ दिवस मी एका आशेवर जगत होतो... तू मला जवळ घेशील, हृदयाशी धरशील... प्रतिभा : (चेहरा पिळवटलेला, मूक आक्रंदन) नाही - गुरू - पुन्हा असं काही बोलू नकोस. मी - मी विरघळून जाईन - परत स्वत:ला सावरू शकणार नाही मी - मी प्रेरणेला वचन दिलंय - मी पुन्हा कधीच गुरूच्या जीवनात येणार नाही म्हणून... । गुरू : (उसळत) मग कलाजीवनात तरी का आलीस? आपलं पर्सनल लाईफ आणि कला एकमेकात मिसळलेली आहे, हे विसरलीस? प्रतिभा : ती - ती माझी चूक झाली. कलावंत म्हणून. आणि प्लीज, तूही ती करू | नकोस ... मला जाऊ दे.. गुरू : ठीक आहे... हा - हा माझा शेवटचा प्रयत्न होता प्रतिभा - मी हरलो ... पण एकदाच - मला जवळ घे - क्षणभरच. मग जा... पुन्हा असा हट्ट नाही धरणार... (प्रतिभा त्याच्या जवळ जाते.. त्याचे हात हातात घेते, मग त्याचा चेहरा ओंजळीत धरते व डोळ्यात पाहाते. हुंदका देत प्रतिभा निघून जाते. गुरू विमनस्कपणे क्षणभर ती गेलेल्या दिशेकडे पाहात राहतो. (क्षणभर अंधार. पुन्हा रंगमंच उजळतो तेव्हा गुरू आणि प्रेरणा) । गुरू : प्रेरणा.. केवढा दर्द ओतलास आज गाण्यात.. आणि त्या दर्दला किशोर स्टाईलनं हमिंगची अनोखी लाजवाब जोड... स्टॅडिंग ओव्हेशन... (टाळ्या वाजवत उठतो) लक्षदीप ॥ २५७