पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निखळ सुख दु:खाची आणि कॉम्प्लेक्स इगोची जाण अधिक समृद्ध केली आहे... ह्याचा... ह्याचाच मला पुढच्या सिनेमात उपयोग करून घेतला पाहिजे... अब्बास, आपला पुढचा सिनेमा खराखुरा ऑल टाईम क्लासिक ठरला पाहिजे... प्रेरणा : गुरू... मी तुला पूर्णपणे साथ देईन. (गुरू अस्वस्थ) प्रेरणा : काय झालं गुरू? गुरू : पण हिरॉईन म्हणून प्रतिभाशिवाय कुणी डोळ्यासमोर येत नाही. प्रेरणा : तू माझ्यासाठी संकोच करू नकोस. घे तू तिला तुझ्या सिनेमात. ती | खरोखरच ग्रेट अॅक्ट्रेस आहे. गुरू : (सुस्कारा सोडत) ओ बँक गॉड... प्रेरणा (उदास स्वर) पण ती कबूल | होणार नाही.. तिनं माझ्याबरोबर पिक्चर न करायचा निर्णय घेतला आहे.. प्रेरणा : मी भेटेन तिला... मी वळवेन तिचं मन. गुरू : प्रेरणा... मी एवढा चांगला नाही, प्रेरणा. माझ्यासाठी तू एवढं करावंस | इतका तर.. प्रेरणा : गुरू... आपला सिनेमा बेमिसाल ठरला पाहिजे... हा माझाही स्वार्थ आहे तुझ्याइतकाच ... आणि त्यासाठी मी प्रतिभाचं मन नक्कीच वळवीन. (अंधार)। | (पुन्हा प्रकाश येतो तेव्हा स्टेजवर गुरू व प्रतिभा) गुरू : एकाच टेकमध्ये दीड मिनिटाचा सीन आणि अर्ध्या पानाचा डॉयलॉग ओ. के. झाला. ग्रेट. सिंपली ग्रेट. प्रतिभा, रिहर्सल न करताही किती !...cellent love scene रंगवलास... या फिल्मचा तो हायलाईट ठरेल. प्रतिभा : वॅक्यू गुरू. मी आता जाते माझ्या रूममध्ये. गुरू : जरा थांब ना. कॅमे-यापुढे एवढी इमोशनल होतेस पण सीन संपला की | किती कोरडी... अलग होऊन जातेस? प्रतिभा : फक्त सिनेमासाठी मी परत इथं आलेय, बास. गुरू : खोटं खोटं बोलतेस तू, मघाशी जो लव्ह सीन रंगवलास तो अस्सल | नव्हता? त्याला आपले वैयक्तिक संदर्भ नव्हते? प्रतिभा : (उसळून पण घायाळ स्वरात) पुरे गुरू - तो चॅप्टर माझ्यासाठी क्लोज झालाय. तू प्रेरणेचा होऊन राहा - मला त्यात समाधान आहे. गुरू : पण तुझाही मी नाही का? प्रतिभा : ओ - नो (तोंड ओंजळीत लपवते. पण हुंदका आवरत नाही) गरू : तुझं रडणं सगळं सांगून गेलंय मला, अशी दूर का राहातेस? मला २५६ । लक्षदीप | IS + ।