पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रेरणा : हा भाईजान... मैं... मै... कोशिश करूंगी... लेकिन बहुतही मुश्किल काम है. मुझे आप साहस देते रहना... मेरा धीरज बांधते रहना.. (तोंड ओंजळीत लपवते.. नि:शब्द हुंदके. गुरू येतो.. उदास चर्या काळवंडलेली. अब्बास व प्रेरणेला पाहतो. क्षणभर चकित. मग दोघं सुस्कारा टाकीत) गुरू : (अब्बासला) मला माहीत आहे... तूच तिची समजूत घालून घरी आणलं असणार... शुक्रिया मेरे दोस्त. अब्बास : बोल तिच्याशी... (अब्बास निघून जातो) गुरू : ये प्रेरणा. यू आर वेलकम हिअर. आणि प्लीज.. पुन्हा मला सोडून जाऊ नकोस... तुझ्याशिवाय जगण्याची मला सवय नाही गं... प्रेरणा : हां गुरू, पुन्हा मी कधीही हे घर सोडून जाणार नाही... पण एकदाही कधी मला बोलवायला आला नाहीस. गुरू : कोणत्या तोंडानं? प्रेरणा... मला माझी शरम वाटते... तुझ्या वेदना समजतात, पण त्या दूर करणं शक्य नाही, हे लक्षात आलं की मी स्वत:च्या नजरेत उतरत जातो... कसा येऊ मी तुझ्याकडे? प्रेरणा : असं म्हटलं की झालं... मी नाही माझा अपमान विसरून पुन्हा पुन्हा येते तुझ्याकडे? प्रेमात फक्त स्त्रीनंच का स्वत:ला अपमानित करून पुरुषाला सावरायचं नेहमी? गरू. नाही, असं तू स्वत:ला अपमानित समजू नकोस प्रेरणा. उलट मी तुझी प्रतारणा करतोय हा माझ्या मनातला अपराधीपणा कमी आजही झालेला नाही. तुला आपली ही फिल्मी दुनिया माहीत आहेच... इथं दररोज पार्टनर बदलले जातात... पण मी कधीही बाजार सेक्स जवळ केला नाही... प्रतिभा खरंच माझ्या जीवनात यायला नको होती. पण एक सांगतो, आजवर तुला हे कधीही सांगितलेलं नाही. मी अजूनही प्रतिभाशी पूर्ण समरस होऊ शकलेलो नाही... तिच्या बरोबर असतानाही मला तूच आठवतेस.. पण तुझ्याबरोबर असताना मात्र मला सगळ्या जगाचा विसर पडलेला असतो. प्रेरणा : (चकित होत आनंदानं) खरंच? मला खरंच हे ऐकून किती बरं वाटतंय | म्हणून सांगू ... गुरू, तुझ्याविना मला जीवनच नाहीय... आणि हे मी प्रत्येक वेळी घर सोडल्यावर अनुभवते... गुरू : बॅक्यू... यापुढे प्लीज हे घर सोडून जाऊ नकोस... तू नसताना मी एकट्यानं हे दिवस कसे काढले कुणास ठाऊक... आपल्या बेडरूमनं माझा एक एक हुंदका साठवून ठेवला असेल. माझं मूक आक्रंदन आणि घुसमट तिनं पाहिली आहे. या काळानं माझी माणसाची... माणसाच्या लक्षदीप ॥ २५५