पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इथं प्रेरणा खरंच येऊन गेली होती? (नि:श्वास टाकीत) खैर... जो भी हो, कदाचित ती येऊन बोलली किंवा माझ्याच मनानं तिच्या भेटीचा हा सीन रचला. हे डायलॉग पण माझ्या मनातूनच आले असतील. पण त्यानं माझ्या टु बी ऑर नॉट टु बी च्या इंटरनल डायलेमाचे डायमेन्शन बदलले हे खरं.. ते अधिक गुंतागुंतीचे आणि धारदार झाले. ही मनाची गुंतागुंत... मी त्यानं घायाळ होतोय माणूस म्हणून, की कलावंत म्हणून ते एंजॉय करतोय? मानवी मनाच्या अगम्य तळाचा शोध लागतोय थोडा, म्हणून एक्साईट होतोय... त्या अमूर्त पण अस्तित्वाचा प्राण असलेल्या मनाचा शोध घेतला पाहिजे. हीच तर आपली मूलभूत प्रेरणा आहे आणि ती जाणण्याची, कलाकृतीत परावर्तित करण्याची प्रतिभा पण लाभलीय... (पुन्हा संगीताचा कल्लोळ, रंगमंचावर एका प्रकाशझोतात प्रेरणा, तर दुस-या बाजूच्या प्रकाशझोत प्रतिभा त्याला दिसते.) कधी काळी एक गलबत भरकटत होतं दिशाहीन. त्याच्यासाठी दीपस्तंभ । झालीस तू प्रेरणा... आणि त्या गलबताला बंदर मिळालं... विसाव्याचं ठिकाण मिळालं... साथ मिळाली जीवनात... आणि कलेतही... तरीही मनातली प्रतिभा... काही तरी हुडकत होती... तिला ओढ होती नवनिर्मितीची... स्वतःची मयसभा करण्याची... त्याला रंग - रूप आणि आकार... दिलास तूं प्रतिभा... (तिच्याकडे झेपावत) मला - मला तू हवीस... (प्रेरणाकडे वळत) आणि तूही हवीस - तूही हवीस... (मोठ्याने) मला प्रेरणा हवी - मला प्रतिभा हवी... प्राण आणि आत्मा... जगायला दोन्ही हवं ना? एक सोडून दुसरी कसं चालेल? (प्रेरणेला) समजतं का मी काय म्हणतो ते? २५० । लक्षदीप