पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुरू : खरंय प्रेरणा. पण आता या क्षणी मला माझ्या मनाचा ठावच लागत नाहीये. प्रेरणा : माहितेय - दुपारी मी तुझ्याशी भांडले ना. आणि आता प्रतिभाही तुला संकटात टाकतीये. सहाजिक आहे तू गोंधळून जाणं. गुरू : किती मनकवडी आहेस प्रेरणा. पण (स्वत:शीच) हा अजूनही का मला भास वाटत आहे? प्रेरणा, तू खरंच इथं माझ्या समोर आहेस? मला स्पर्श कर बघू. प्रेरणा : (खळखळून हसत) तुझ्या मनात मी आहे, मग वेगळा स्पर्श हवा? गुरू : (प्रसन्नपणे) हां प्रेरणा, तू तर माझ्या मनात आहेस, श्वासाश्वासात आहेस. मी आज जो कोणी फिल्ममेकर आहे, तो तुझ्यामुळेच आहे. पण - पण... प्रेरणा : पण आता प्रतिभा माझ्या कलाजीवनाचा अविभाज्य भाग आहे; असंच ना? गुरू : ते तुझसे थोडाही छिपा है? प्रेरणा : या फिर तेरे जिंदगीका अटूट हिस्सा बन गयी है? गुरू : ये - ये भी सही है। पर मैं क्या करू? असं ठरवून थोडंच होतं? हा | इत्तेफाक आहे प्रेरणा। प्रेरणा : पण कलेपेक्षा जीवन मोठं असतं - जर मी तुझ्या जीवनाचा हिस्सा आहे. अर्धांगिनी आहे तर... गुरू : अगं, पण मी ते कुठे नाकारतोय? फिर भी... प्रेरणा : हा फिरभीच आपल्या वादाचं मूळ आहे... प्रेम आणि सहजीवन हे | स्वामित्व मागतं आणि मी तेच मागतेय गुरू - तो माझा अधिकार नाही? गुरू : अगं, आहे ना... पण तरीही प्रत्येकाला स्वत:ची अशी वेगळी स्पेस लागतेच. प्रेरणा : ती स्वत:साठी लागते. कलेच्या साधनेसाठी लागते - त्याला माझी हरकत नाही. गुरू : मग? प्रेरणा : हरकत आहे त्या स्पेसमधल्या प्रतिभेच्या अस्तित्वाला. जिथं फक्त मी असायला हवं तिथं ती पण आहे... हे मला सहन नाही होत गुरू. गुरू : मी... मी काय करू? प्रेरणा : सगळ्यात प्रथम सत्याला धीटपणे समोर जायला शीक. अब्बासभाई मघाशी हेच तर सांगत होते. फैसले की घडी आई है और तुम्हारे फैसले | का इंतजार मुझे भी है... (वाद्यसंगीत, निळा प्रकाश नाहीसा होतो.) | गुरू : प्रेरणा - प्रेरणा ... कुठे गेली ही? (आजूबाजूला पहात) हा भास होता? लक्षदीप ॥ २४९