पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रतिभा : (कडवट असते) तुम्हीच मघाशीच म्हणालात ना.. माणसानं सत्याला धीटपणे समोरं... (निश्चयी सुरात) मी मनाचं साहस बांधलं आहे.. (गुरूला) गुरू, मी जे बोलले त्याचा विचार कर. मला तू सचमुच दिलोजानसे हवा आहेस पण - पण असा नाजायज रिश्ता नको - मै शादी चाहती हूँ। बस... (प्रतिभा निघून जाते) । अब्बास : गुरू, जरा सोचो क्या फरक पडता है दूसरी शादीसे? प्रेरणाशीही याविषयी बोलता येईल. तू काय तिला विचारून प्रतिभेच्या प्रेमात पडलास का? गुरू : तुझ्या धर्मात ठीक आहे रे. पण.. अब्बास : आपण सगळे कलावंत आहोत. तोच आपला धर्म, तीच आपली जात. आणि आज तुला हे आठवंतय, की मी मुसलमान आहे, तू हिंदू आहेस? लानत है तुझंपर. गुरू : सॉरी यार. (क्षणभर थांबून) मला कायद्याची भीती वाटते आणि त्याहीपेक्षा | प्रेरणाला काय वाटेल याची भीती वाटते. अब्बास : आणि प्रतिभा? तिची काळजी नाही वाटत? गुरू : हे काय विचारणं झालं अब्बास? तिच्याशिवाय माझं कलाजीवन शून्य | आहे यार. अब्बास : मग तिला तुला सांभाळलं पाहिजे. त्यासाठी प्रतिभानं तुझ्यासमोर ठेवलेला लग्नाचा प्रस्ताव मला ठीक वाटतो. बस्. गुरू : (अचानक अब्बास गेलेल्या दिशेने पाहात स्वत:शीच) बरं झालं अब्बास, आज तू प्रतिभेला रोखलंस ते. तिच्या विचारंची दिशा मला जाणवत होताच. मी कशाला घाबरतोय? प्रतिभा का खोने का डर? या फिर प्रेरणा का लिहाज? प्रेरणा... ओ माय गॉड.. मला काहीच समजत नाहीय... अशा वेळी प्रेरणा जवळ असती तर? ती किती खंबीर आहे (मंद संगीत, निळसर प्रकाश, छायासम प्रेरणा त्याला दिसते.) आवाज : मी इथंच तर आहे गुरू. तुझ्याविना मला अस्तित्वच कुठे आहे ? गुरू : प्रेरणा... तू परत आलीस? प्रेरणा : (हसून) मी तुला सोडून कुठे गेले होते? गरू : मला अजूनही खरं वाटत नाहीय. डोळ्यावर विश्वास बसत नाहीय. प्रेरणा : तुझ्या मनाचा कौल काय सांगतो? मन हीच खरी गोष्ट, किमान आपण कलावंतासाठी. म्हणून तर आपल्याला मनस्वी म्हणतात. मनाची प्रेरणा आपली प्रतिभा फुलवत असते आणि कलाकृती घडत जाते आपल्या हातून. विसरलास गुरू? ते तुझंच लाडकं मत ना? २४८ ॥ लक्षदीप