पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सोडून दे म्हणत नाही... मी माझ्याच घरी राहीन... पण मला शादी करायची आहे. गुरू : (धक्का बसल्याप्रमाणे हतबुद्ध होत) काय? शादी? प्रतिभा... मैने कभी | इस बारे में सोचा तक नही। प्रतिभा : (रागाने उसळत) खराखुरा पुरुष आहेस तू.. अप्पलपोटा. लग्न न करताही मी मिळते ना तुला? मग गरजच काय तुला लग्नाची? गुरू : प्रतिभा, आज तुला झालंय तरी काय? असं वाकड्यात काय शिरते आहेस? लग्न म्हणजे तरी काय असतं? दोन मनं, आत्मा एक होणंच ना? आपण का अलग आहोत? प्रतिभा . मग त्यालाच समाजासाठी... समाजाच्या मान्यतेसाठी कायदेशीर रूप | द्यायचं मी म्हणतेय... कुठलीही स्त्री संसारात... जीवनात दुय्यम स्थान । स्वीकारत नाही... पण तुझ्या प्रेमात मी एवढी दुबळी... असाहाय्य बनलेय... (रडत राहाते) अब्बास : गुरू, मुझे ये ठीक लगता है... कुछ हुदतक... कमसे कम प्रतिभा का । प्रॉब्लेम का हल हो सकता है. वो टूटनेकी कगार पर हैं, बच सकती हैं, तू ने उसके साथ शादी की, तो वो संवर जायेगी... | गुरू : अब्बास, प्रतिभा, तुम्ही माझाही जरा विचार करा. विवाहित असताना दुसरं लग्न? हे संबंध कायदेशीर करणं कसं शक्य आहे? प्रतिभा : मला कुठे तुझ्या इस्टेटीवर अधिकार सांगायचा आहे? मला फक्त चारजणांच्या नजरेत तुझं पत्नीपद भूषवायचे आहे. बस गुरू समाज हे मान्य करील असं वाटतं? प्रतिभा, ह्या सामाजिक बंधनाचाच जाच कधी कधी असह्य होतो. प्रतिभा : (अब्बासकडे वळत, डोळे पुसत) पण मी असं किती काळ फरफटत येऊ तुझ्यामागे? मनानं मुर्दाड असते तरी एकवेळ जगणं सुसह्य झालं असतं. पण ही प्रतिभाही एक अस्सल कलावंत आहे व तिलाही कॉम्प्लेक्स मन लाभलं आहे. पराकोटीची हळवी आहे ती. आणि समाजाला ठोकर मारण्याइतपत धीट पण नाही... हां गुरू, मला आपलं करू शकत नाही चारजणाच्या साक्षीनं... मला नाही वाटत, मी एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून कमीपणा आणणारी अवस्था फार काळ सहन करू शकेन. ह्या सगळ्याचा ब्रेकिंग पॉईंट आलाय, फार फार जवळ... । अब्बास : नो, शहनाज नो... मला कळतंय तुझ्या मनाचे विचार कोणत्या दिशेनं चाललेत ते. तू कोणत्या निर्णयापर्यंत येती आहेस ते. पण नको. त्याचा उच्चारही नको. लक्षदीप ॥ २४७