पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अब्बास : पण किती काळ किती काळ असा त्यापासून विन्मुख राहशील? जेव्हा ते सत्य समग्रपणे नग्न स्वरूपात तुझ्यासमोर येईल... तू त्याचा सामना करू शकणार नाहीस.. मिटून जाशील. मला त्याचीच भीती वाटते. प्रतिभा : नको भाईसाब... त्याला परेशान नका करू... हे सगळं आता बोललंच | पाहिजे का? अब्बास : हां, शहनाज हां. केव्हा तरी मला हे एकदा बोलायचं होतं. हीच वेळ | आहे, तुम्ही दोघांनीही साहस बांधलं पाहिजे., हिंमत धरली पाहिजे. गुरू : ओ. के. यार... मला तू काय म्हणतोय याचा थोड़ा थोड़ा बोध होतोय... ते व्यक्ती म्हणून स्वीकारायला... पचवायला कठीण आहे. जखमी, उद्ध्वस्त करणारं आहे. पण एक कलावंत म्हणून मला फार एक्सायटिंग वाटतंय. (एकदम उचंबळून येत उत्तेजित स्वरात) अब्बास, प्रतिभा... या क्षणी एक सुचतंय... प्यासाचा पुन्हा रिमेक करायचा.. पण तो प्रेरणा, प्रतिभा आणि माझ्या रिलेशनशिपवर बेतलेला. एकाच वेळी दोघी हव्यात आणि एकीला सोडून दुसरी नको... असे काही तरी गूढ जाणवतंय... अब्बास : गुरू... अरे मी तुझ्या जीवनात आत्ता... या क्षणी चालू असलेल्या वादळांच्या संदर्भात बोलतोय... त्यावरही तुला सिनेमा सुचतो? गुरू : (तंद्रीतच) जीवनापेक्षा कला मोठी, सिनेमा मोठा. उद्या मी नसेन. प्रतिभा, प्रेरणा नसतील. पण ही मानवी गुंतागुंत असेल. त्यावर बेतलेला, गहराईको छुनेवाला सिनेमा मी जर बनवला तर आय विल बी इम्मॉर्टल... सो, छोडो ये मेरा-प्रेरणा का प्रॉब्लेम, लेट अस डिस्कस धिस थीम, यार. अब्बास : पाहिलंस प्रतिभा... केवढा गजबका आर्टिस्ट है. कलावंताचं असं दर्शन होणं दुर्मीळ असतं. प्रतिभा : हां, तो कलावंत म्हणून खरंच दुर्मीळ आहे पण तेवढाच धीट माणूस असता तर फार बरं झालं असतं. अब्बास : एक्झाक्टली. मला हेच सांगायचे आहे तुम्हाला दोघांना. गुरू प्यासामधला नायक आणि तुझ्यामध्ये फारसे अंतर नाही... पण प्रेयसी आणि गणिका म्हणजे प्रेरणा आणि प्रतिभा नाहीत. गरू. आणि माझ्यासाठी दोघीही तेवढ्याच प्रिय आहेत. एक प्रेरणा जगण्याची... तर दसरी प्रतिभा.. स्वत:ची मयसभा निर्माण करून त्यात विहार करण्याची... एक राह दे, दुसरीचा मात्र त्याग कर असं कुणी म्हटलं तर ते कसं शक्य आहे ? प्रतिभा : मी कुठे हे अमान्य केलंय? पण या नात्याला मला फक्त सामाजिक मान्यता हवीय. मला नाही सहन होत कोणी त्याची कीप म्हटलेलं. नाही सहन होत. (गुरूजवळ जात) गुरू... माझ्याशी विवाह कर.. तिला मी २४६ । लक्षदीप