पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुरू : लोक तर तुला गुरूची प्रतिभा म्हणतात आणि मला प्रतिभेचा गुरू. हे। काय टोमणे झाले? प्रतिभा : हे तुझ्या... माझ्या समोर... पण माघारी? (चेहरा पिळवटून येतो, ओठ थरथरतात, दाताने ते चावीत) गुरूची - गुरूची रखेल? होय - असंच म्हणतात सगळे ... कारण तू विवाहित आहेस. प्रेरणा तुझी बायको आहे. मी मात्र... (हुंदका देत चेहरा ओंजळीत लपवते.) गुरू : (तिच्या जवळ जात, तिच्या केसातून हात फिरवीत) किती भयंकर आहे | हे.. समाज किती दुष्ट असतो हे मला कधी समजलंच नाही. प्रतिभा : पण खोटं का आहे? सांग ना.. तुझ्या-माझ्या रिलेशनशिपला काय नाव | द्यायचं? अब्बास : गुरू... तिचं उसळणं... रागावणं... आणि कठोर बोलणं अस्वाभाविक नाही. तिला समजून घ्यायचा प्रयत्न कर. गुरू : (किंचित त्रासिक सूर) तुला काय म्हणायचंय अब्बास? अब्बास : मला एक सांग... दुपारी प्रेरणा तुझ्याशी भांडून भावाकडे निघून का गेली? गुरू : नेहमीचंच कारण - प्रतिभा जशी माझ्या जीवनात आली तसं हे सारं | संपलं.. नेहमी भांडणं, धुसफूस. आता प्रेरणा प्यायला पण लागलीय अब्बास... मला कळत नाही ती अशी का वागते ते? प्रतिभा : कारण सांगू? स्त्री प्रेम करते सर्वस्वानं.. ज्याला आपलं मानलंय त्याला | सर्वस्वानं भरभरून देते. त्यात ती कुणाला शेअर नाही करू शकत... म्हणूनच मला फार गिल्टी वाटतं. प्रेरणेपासून तिचा नवरा मी हिरावून घेतला. गुरू : प्रतिभा, तुम तन मन से मेरे निकट हो... शायद ये संबंध जायज नहीं हैं, पण आपली रिलेशनशिप केवळ एवढ्यानंच का डिफाईन होते? नाही प्रतिभा, आपले संबंध दिल की गहराई तक है... यू आर माय फाईन्ड - माय क्रिएशन... मी तुझा निर्माता आहे... अब्बास : परंपरेनं पुरुष स्त्रीला मालकी हक्काची वस्तू समजून खेळतो... तू निर्माता म्हणन तिच्याशी खेळतोस... काय फारक आहे? गुरू : पुरे झालं तुझ अॅनालिसिस अब्बास... तुला काय मिळतं असं मनाची सालटी काढण्यात? संबंधांना छिन्न भिन्न करण्यात? अब्बास : सत्यापासून कोणी पाठ फिरवू नये म्हणून गुरू : नाही सहन होत मला अब्बास, नाही सहन होत... सत्य एवढं घायाळ . करणारं असेल तर मला ते नको... लक्षदीप । २४५