पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(पुन्हा प्रकाश येतो तेव्हा गुरू आणि प्रतिभा एकत्र बाहेरून रंगमंचावर प्रवेश करतात.) प्रतिभा : कसला विचार करतोयस एवढा गुरू? गुरू : एक नव्या पिक्चरचा जर्म सुचतोय. तुला आणि राजला घेऊन एक पिक्चर करता येईल... एकदम वेगळा... राजच्या हसू आणि आसूच्या प्रतिमेला गहराईपर्यंत नेणारा आणि त्याला मी तुझ्या रूपात प्युअर रोमान्सची जोड देईल. हां हां, येस येस! माझा पुढचा पिक्चर याच थीमवर असेल. प्रतिभा, आता इथं अब्बास पाहिजे होता, म्हणजे त्याला माझी वन लाईन सांगता आली असती - तो त्यातून एक ग्रेट स्टोरी डेव्हलप करेल. अब्बास : (प्रवेश करीत) बंदा हाजीर है जनाब। भूल गये? आपने ही तो पार्टी में कहा था... घर आने को... मैं तुम्हारे स्टडीरूममे कबसे मॅग्जीन पढते तुम्हारी राह देख रहा था. कुठे गेला होतास पार्टीनंतर...? गुरू : तुम से क्या छिपाना यार? पार्टीमध्ये राज, नर्गिस आणि प्रतिभाबरोबर त्यांच्या पुढच्या पिक्चरची धुंद गाणी ऐकून मन प्रफुल्लित झालं होतं. त्या मूडमध्येच आम्ही समुद्रावर जाऊन बसलो. त्यामुळे लेट झाला. प्रतिभा : ओ. के. तुमचं स्टोरी सेशन सुरू करा... मी चलते. गुरुला फक्त सोडायला म्हणून आतपर्यंत आले. फार वेळ झालाय. गुरू : वा... असं कसं? ही थीम तुझ्याबरोबर डिस्कस केल्याशिवाय साकार होणार नाही. तू तर हवीच. (वेगळा स्वर) प्रतिभा... आज इथेच राहणार आहेस तू...। प्रतिभा : (चकित) काय? इथे?... या घरी मी राहू? भाईसाब, इन्हे कुछ समझाओ... अब्बास : शहनाज... प्रेरणा भाभी घरसे आज ही चली गयी है... (प्रतिभा त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पहाते) दोघात कडाडून भांडणं झाली... रात की तनहाई अकेला बर्दास्त नहीं कर पाएगा... गरू : (कडाडत) कशाला नको त्या गोष्टींची आठवण करून देतोयेस अब्बास? आज भरपूर प्यायल्यानंतर आत्ता कुठे मूड बरा व्हायला लागला होता, नका त्या गोष्टींची आठवण देऊन मिठाचा खडा टाकलास मित्रा. प्रतिभा : (तीव्र उच्च स्वर... संतापानं धगधगता) वा... गुरू... वा... प्रेरणा नाही, म्हणून मला राहण्याचा आग्रह? मी काय तुझी कीप आहे, ती नसताना तुझी सोबत करायला? गरू. शी... किती कठोर बोलतेस प्रतिभा? हे तुझ्या मनात आलं तरी कसे? कीप? किती घाणेरडा शब्द वापरलास तू आपल्या नात्यासाठी. प्रतिभा : (हंदका) पण मी एक स्त्री आहे रे... मला रिलेशनशिपमध्ये स्थैर्य हवंय... २४४ ॥ लक्षदीप