पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ॐ ॐ ॐ ॐ का अंतर पडलंय आपल्या नात्यात? प्रतिभा... प्रतिभा... ऐकते आहेस ना? प्रतिभा : (न कळत बोलते. पण शुष्क स्वर) गुरू, मी ऐकतेय. का फोन केलास एवढ्या रात्री? गुरू : (गुणगुणत) कर रहा था गमे जहाँ का हिसाब आज तू याद बेहिसाब आये. तुम्हारी याद के जब जख्म भरने लगते हैं, किसी बहाने तुम्हे याद करने लगते हैं। प्रतिभा : आता मी कठोर झाले आहे गुरू. अशा मनाला जखमी करणा-या तुझ्या शब्दांनी घायाळ नाही होणार आता. (किंचित चढा सूर) मला सांग, इतक्या रात्री का फोन केलास? गुरू : प्रतिभा, मला तू हवी आहेस... येशील? तू नाही आलीस तर मला । कधीच पाहू शकणार नाहीस... (प्रतिभा विदीर्ण होत त्याचं बोलणं ऐकते आहे. पण बोलत नाही. चेह-यावर सांमिश्र भाव) प्रतिभा : गुरू... तुला मरणाचे पहिल्यापासून ऑबसेशनच आहे. अरे, तुला कसं कळत नाही? या रात्री मी एकटी कशी येऊ? ड्रायव्हर पण नाहीये आता ' माझ्याकडे.. ठेवते मी फोन... (फोन ठेवू लागते) गुरू : हॅलो... हॅलो प्रतिभा... अगं, फोन नको ठेवू. ऐक माझं... हॅलो हॅलो... प्रतिभा : गरू, सॉरी. (कठोरपणे निश्चय करीत फोन ठेवून देते) (म्युझिक?) प्रतिभा : मला वाटलं, तसंच घडतंय. मी कणाकणानं विरघळतेय. कितीही मन घट्ट केलं तरी गुरूचा आवाज ऐकला की लोहचुंबकाप्रमाणे त्याच्याकडे जीव झेपावतो... परवान्याप्रमाणे जळून जाणं हीच या शमेची - माझी किस्मत आहे का? गुरू : प्रतिभा... तू असा फोन बंद करायला नको होतास (टीपॉयवर ठेवलेल्या कांपोजच्या गोळ्याची बाटली उघडतो व ती व्हिस्कीच्या बाटलीत उपडी करतो) सॉरी अब्बास... तू मला बजावलं होतंस - कंपोजच्या गोळ्यांना हात लावायचा नाही म्हणून बट - नो अल्टरनेटीव्ह. आज अखेरची रात्र आहे. पण ती मी स्वत:हून ओढवून घेतोय एवढंच समाधान... (पेला उचलून घोट घेत) कदाचित हा अखेरचा प्याला असेल... हा जेव्हा संपेल... कदाचित माझं भान हरवलेलं असेल... पुन्हा कधीही भान न येण्यासाठी... तब प्रतिभा, तू बहोत रोएगी... बहोत पछाताओगी ... (तो उठतो. त्याचा तोल जात आहे. दारूचे घोट घेत खिडकीमधून बाहेर पाहात रहातो. अंधार) लक्षदीप । २४३