पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. (फोन ठेवतो. अस्वस्थपणे रंगमंचावर येरझाया घालू लागतो. गुणगुणतो) दिल हि तो है, न संग ओ खिश्त, दर्द से भर जाये क्यूं रोयेंगे हम हजार बार, कोई हमें सताये क्यूं? फार.. फार... एकाकी वाटतंय प्रतिभा.. गेलं वर्षभर तू मला भेटली नाहीस की फोनवर तुझा आवाजही ऐकला नाही.. कधी विचार केलास की कैसे मैंने ये दिन... ये कभी खत्म न होनेवाली लंबीलंबी राते गुजारी होगी? ये भी जानता हूँ की, मुझसे दूर होकर तू भी कोई खास खुश नहीं रही होगी... “यह कह सकते हो, हम दिल में नहीं है, पर यह बतलाओ, की। अब दिल में तू ही तू हो, तो आँखोंमे निहा क्यूं हो... । (पायसाचा आवाज वाढवणे.. हळूहळू कमी करणे. बंद करणे. गुरू फोनपाशी जातो.) गुरू : हॅलो... हॅलो... (रिसीव्हरकडे बघत) फोन कट झाला की केला? पलीकडे अम्मीजान होती की प्रतिभा? नक्कीच प्रतिभा असणार... का माझा फोन घेत नाहीस प्रतिभा? एवढा दुरावा? एवढा राग? का? (फोन ठेवून अस्वस्थपणे येरझाच्या घालू लागतो.) प्रतिभा : (रिसीव्हरशी खेळत स्वतःशीच) फार कठोर आणि मगरूर झालीस शहनाज तू... त्याचा फोनही घेत नाहीस? (डोकं धरीत) ओ... नो... नाही मला त्याच्याशी बोलायचं, गुरू... गुरू... गुरू... पूरे दिलो दिमागमें छाकर भी कुछ बचा है... शायद मुझे परेशान करने के लिये... किती कठिण आहेस तू... तुझ्या संगतीत तुझ्याजवळ राहू शकत नाही आणि तुझ्यापासून दूर जाऊन जगूही शकत नाही... हा तुझा प्रभाव, का माझा दुबळेपणा? हे पुरुष म्हणून तुझं छळणं, की प्रकृती म्हणून माझं सोसणं? प्रश्न... मनात उठणारे नुसते प्रश्न! तुझा... तुझा आवाज ऐकला की मला विरघळून जाण्याची... तुझी मनात ओढ जागृत होण्याची भीती वाटते... मोठ्या कष्टानं... जिवाच्या करारानं तुझे माझे बंध मी जाणीवपूर्वक तोडलेत. ते मला पुन्हा जोडायचे नाहीत. मी... मी फार दुबळी आहे रे गुरू... आपल्या रिलेशनशिपचं भान मला बेभान करतं.. (फोनची रिंग वाजू लागते. नाईलाजाने प्रतिभा फोन उचलते.) गुरू : हॅलो... हॅलो... (हळुवारपणे) मला माहीत आहे प्रतिभा, तूच फोन उचलला आहेस... प्लीज - प्लीज फोन बंद करून नकोस.. किती दिवस झाले... तुझा आवाज ऐकला नाही... एवढा का बदनसीब आहे मी? एवढे २४२ । लक्षदीप