पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुरूबरोबर केलेला आणि त्याच्याशिवाय केलेला प्रवास मला समजून घ्यायचा आहे. प्रेरणा : त्याचा आम्हाला दोघींनाही भयंकर त्रास होईल भाईजान... मला मग कितीही प्यायले तरी नशा चढणार नाही आणि फक्त तळमळत राहीन मी सगळी रात्र. प्रतिभा : अॅक्शन म्हटलं की ऑन आणि कट म्हटलं ऑफ होणं हा कलाकाराचा धर्म. पण त्यानंतर मी जगापुढे ऑफ आणि स्वत:शीच ऑफ असते भाईजान, मला गुरूबद्दल जे वाटतं ते केवळ माझं, खाजगी आहे. रोझीची भूमिका करताना ‘आज फिर जिने की तमन्ना है' म्हणत थिरकले खरी, पण ती फक्त माझी पडद्यावरची भूमिका होती. पण आतून... खूप आतून मात्र ‘आज फिर मरने का इरादा हैं' असंच सारखं वाटतं मला, मी माझा इरादा फक्त कृतीत उतरवत नाही एवढंच. अब्बास : मला तर असं वाटतंय की बोलल्यामुळेच कदाचित मोकळे होऊ शकाल तुम्हीं दोघीं. प्रेरणा : बोलल्यामुळे दु:ख कमी होईल की वाढेल ते नाही मला सांगता येणार, पण ते संपणार तर नाहीच ना भाईजान? (काही क्षण सगळे अस्वस्थ) । प्रतिभा...तु बोल...आता इतक्या वर्षानंतर तेव्हासारखी तीव्र भावना राहिली नाही माझी. कदाचित आता मी तुला अधिक मोकळेपणानं समजू शकेन... प्रतिभा : हल्ली सिनेमाचे डॉयलॉग सोडले तर दिवस दिवस बोलतच नाही मी... आज तुमच्यासमोर एवढी कशी काय बोलतीये तेच कळत नाही... मला हिच्याप्रमाणे दु:ख दारूत बुडवता येत नाही की अश्रू ढाळत रात्री जागवता येत नाही. लेकिन सचमुच, आज बहोत सारी बाते करने को जी चाह रहा हैं... गुरू के बारे में... अपने बारे में... प्रेरणा के बारे में भी... अब्बास : आज जवळपास पंधरा वर्षे गेली... मेरी जहन में आज भी गुरू की रात जिंदा है... उसे भूल नही सकता. (मंद पाश्र्वसंगीत सुरू होते. पावसाचा आवाज, विजांचा कडकडाट ऐकू येत जातो. रंगमंचाची दुसरी बाजू प्रकाशित होते. तिथे गुरू उभा, पण त्याचा चेहरा दिसत नाही; फक्त त्याचं अस्तित्व जाणवतं.) गरू : कुठल्या पर्वतांमधून हिंडताहेत श्वासांचे साधू? हा बर्फाचा पाऊस कधी थांबणार आहे? कधी थांबणार आहे हे चेह-याचं निखळणं? कधी भेटणार आहेत माणसं समोरासमोर? बर्फातून मोकळी झाल्यानंतर फांदी हिरवी असेल का? धरेल का स्पष्ट झालेल्या वाटेवर ती सावली? या मंत्रजागराली असणार आहे का काही अर्थ? हे प्रश्नांचे मोहोळ शांत होणार आहे का? २४० । लक्षदीप