पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुढील काळात उलट पद्धतीनं लिंगनिदान सतत करून केवळ पुरुष भ्रूणहत्या केली तरच शक्य आहे -"
 अत्यंत ब्रेकिंग न्यूज मिळाल्याच्या आनंदात इलेक्ट्रॉनिक मीडिया समाधानाने निघून गेले. इतर पत्रकारही पांगले. एक वृद्ध पत्रकार सरदेसाई देगावकरांजवळ येत म्हणाले, “तुम्ही सातत्याने तीस वर्षे बोलत-लिहीत आला आहात जेंडर इनबॅलन्स बद्दल. पण आपला समाज करंटा आहे - नादान ठरलाय हेच खरं. त्यामुळे तुम्हाला हा मैत्रीमेळावा घ्यावा लागतोय. पण तरीही मनाला हे पटत नाही. जाऊ द्या उत्तमराव. आम्ही आता म्हातारे म्हणून कदाचित - अंहं, निश्चितच कालबाह्य झालो आहोत!"
 देगावकर त्यांना निरोप देत आत प्रवेशते झाले.उपस्थित पन्नास तरुणांनी उठून उभं रहात टाळ्या वाजवीत त्यांचे स्वागत केलं.स्टेजवर उभे राहून ते बोलू लागले,आजचा हा मैत्री मेळावा वेगळा व अभूतपूर्व आहे हे खरंच आहे.पण तो कितपत निरोगी आहे याबद्दल मी साशंक होतो.पण गेली चाळीस वर्षे मी रेशीमगाठी नावाचे हे वधूवर सूचक मंडळ चालवतोय.आज ब्लॉग लेखनात त्याची अपरिहार्यता लॉजिकली मांडायला प्रयत्न केला आहे.तो तुम्हाला पटला म्हणून तुम्ही इथे आला आहात. तुमचं मी स्वागत करतो.आणि एकच सांगतो, मनावर विकृतीचं ओझं घेऊ नका. दोषी तुम्ही नाहीत, समाज आहे.आमच्या-सारखी मागील तीन-चार पिढ्यांची पुरुष मंडळी व खास करून मेडिकल कम्युनिटी दोषी आहे. तुमची आई पण तेवढीच दोषी आहे.तिनं लिंगनिदान करून मुलीचा गर्भ पाडला व तुमचा पुरुषी गर्भ वाढवत तुम्हाला जन्म दिला... जन्मलेल्या प्रत्येकाला शरीरधर्म आहे - भूक आहे.आणि गे रिलेशनशिप ही काही आज जन्मलेली नाही. ती आदिम काळापासून अस्तित्वात आहेच - लेस्बियन प्रमाणेच.आज हेट्रो-सेक्युअल असतानाही तुमच्यापैकी अनेकांना गे व्हावं लागतंय. माझी आजच्या मेळाव्यामागची भूमिका स्वच्छ आहे - मुलीचं प्रमाण कमी असताना मुलांना शरीरसुखासाठी समलिंगी संबंध नाईलाजानं का होईना ठेवावे लागत आहेत.त्याला आपण लग्न नाही, पण मैत्री कराराचं रूप देऊ या आणि जबाबदारीनं संबंध ठेवू या... तुम्ही आसपास बोला, चर्चा करा आणि पार्टनर निवडा.पण एडस्ची भीती विसरू नका. प्रोटेक्टेड सेक्सची माहिती करून घ्या. आज ती आम्ही तज्ज्ञ डॉक्टर्सकडून देणार आहोत. तेव्हा - चीअर अप.गुड लक."
 देगावकरांच्या स्पष्ट बोलण्यानं चोरून व दबकत येणारे तरुण मोकळे झाले होते. आणि मग एका अनौपचारिक पार्टीचं रूप त्या समारंभाला प्राप्त झालं. सिग्रेटच्या न कॉफी व स्नॅक्स खात-पीत वर्तुळावर्तुळातून परिचय होऊ लागला, गप्पा रगू लागल्या. अनुरूपता जाणवत गेली आणि पार्टनरची जोडीदाराची निवड होऊ लागली.

 केदार तगडा व सिक्स पॅकवाला होता, पण कुरूप व काळा. त्याला नाजूक चणीचा गोपाळ भेटला. दोघांचा परिचय झाला व गप्पांतून त्यांचे सेवाअल रिस

२३२ । लक्षदीप