पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाशय थोडे दचकले व म्हणाले, “त्याच्याशी तुमचा मतलब?”
 "तसा काही नाही. पण एक उत्सुकता म्हणून- कुतूहल म्हणून.”
 “तुम्ही माझे गाववाले, माझ्या जातीचे. म्हणून तुम्हाला ते मी सांगेनही.” डॉक्टर विचारपूर्वक म्हणाले, “पण ते गुपित ठेवलं पाहिजे."
 “नक्कीच. कारण हा सारा चोरीचा मामला आहे. कायद्यान्वये तुमच्या-प्रमाणे मलाही शिक्षा होऊ शकते, हे मला माहीत आहे."
 वा, किती तर्कनिष्ठ आहात तुम्ही. मानलं बुवा‘चोरोंके भी कुछ उसूल होते है.' असा एक लोकप्रिय डायलॉग आहे. त्याचे तुम्ही किती कसोशीनं पालन करता. धन्य आहे तुमची!
 “पण तुम्हाला सहन होईल का?” डॉक्टर म्हणाले, “माझी फार वेगळी पद्धत आहे.”
 “तुम्ही काय मला बाईलमनाचे कोमल वगैरे समजलात?” तुमचा पुरुषी अहंकार व पीळ प्रकट झाला होता. बरोबर आहे - डॉक्टर तुम्हाला बायकांप्रमाणे कच्च्या दिलाचे समजतात की काय? तुम मर्द हो और मर्द को दर्द नही होता. हुवा तो भी बर्दाश्त कर सकते है. तेवढी ताकद तुमच्यात जरूर आहे. हे पटवून देण्याचा चंगच तुम्ही आज बांधलेला दिसतोय!
 पण तमच्या कल्पनेपेक्षाही भीषण प्रकार होता तो. तुम्ही खरंच जाम हादरून गलात. आणि आयुष्यात प्रथमच डोळ्यात पाणी आलं तुमच्या, आणि - आणि भडभडून ओकलात तुम्ही त्या जागी.
 ही पांढ-यावरची काळी अक्षरंही अधिकतम काळी ठिक्कर पडावीत, असं ते सारं होतं!
 डॉक्टरांनी मागचं दार, लोखंडी शटर वर उघडलं. स्वत: तुमच्या मुलीचं व दिवसभरातील इतर सहा आठ गर्भपाताद्वारे जमवलेल्या भ्रूणांचे एक गाठोडे घेऊन डाक्टर दाराबाहेर आले आणि तिथं ते गाठोडे उघडून जमिनीवर ठेवले.
 तुम्ही पाहात होतात आणि नाही म्हटलं तरी, तुमच्या काळजाचा ठोका चुकत होता. हो ना?
 डॉक्टरांनी आवाज दिला जीवा - शिवा....
 आणि त्यांचे दोन कंपौंडर साखळ्या धरीत दोन्ही हाऊंड जातीच्या त्या भयंकर वाटणाच्या कळ्यांना घेऊन आले. अंधुकसा प्रकाश व बराचसा अंधार होता. दोन्ही मस्त पोसलेल्या मस्तवाल कुत्र्यांचे डोळे त्या पुसट प्रकाशात गुंजेप्रमाणे लकाकत होते व लांब जिभा आत-बाहेर करीत होत्या. त्या जिभांचा लाल रंग तुम्हाला रक्ताळलेला वाटत होता.
 डॉक्टरांनी इशारा केला. दोन्ही कंपौंडरनी हातातल्या साखळ्या सोडल्या व


लक्षदीप ।। २११