पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पण... पण... पण..
 डॉक्टरांनी त्याला निर्वाणीचं सांगितलं, “हे पहा मि. गणेश, काय निर्णय घ्यायचा तो चार आठ दिवसांत घ्यावा लागेल. आता आठवड्याभरात तुमची पत्नी सहाव्या महिन्याची होईल. त्यावेळी तिच्याही जीवाला धोका संभवतो, मग मीच काय, कुणीही डॉक्टर गर्भपात करणार नाही. तेव्हा अधिक लांबड लावू नका.”
 "मला - मला भीती वाटते डॉक्टर. आपलं हे गैरकृत्य उघडकीस तर येणार नाही ना?"
 “तसं कठीण आहे. पण... पण लेट मी थिंक डॉक्टर ‘डोंट वरी' म्हणण्याऐवजी अर्धवट बोलत थांबले. कारण त्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं होतं की, इथं हात धुवून घेण्याची चांगली संधी आहे. तेव्हा त्यांनी दहापाच मिनिटे गर्भजल परीक्षेचा कायदा (पी. सी पी एन डी टी अॅक्ट), त्यांची गंभीर कलमे व होणारी जबर शिक्षा इत्यादी रंगून सांगून शेवटी म्हणलं, “डोंट वरी. असं असलं तरी मी आहे ना. तुम्ही निर्धास्त राहा. फक्त हात सैल सोडायची तयारी ठेवा!"
 निरोप देताना डॉक्टरांनी गणेशला शेवटचं बजावलं, “नाऊ ऑर नेव्हर. थिंक अँड लेट मी नो.”
 आता गणेशाला निर्णय करायचा होता. त्याच्या मनात पूर्ण पसरलेल्या सैतानान तो केव्हाच केला होता. गर्भपात व त्याद्वारे भ्रूणहत्या. डॉक्टर सारी कायदेशीर बाजू सांभाळणार होते.
 त्यानं अखेरीस हा निर्णय पक्का केला, तेव्हा मन शांत झालं. पण तरीही ते त्याला धिक्कारत राहिले. त्याकडे दुर्लक्ष करायचं, सद्सदविवेकबुद्धी दाबायची, है। त्यानं ठरवलं होतं!
 सरितेला पुन्हा त्यानं डॉक्टरांकडे सोनोग्राफीला नेलं, डॉक्टरांनी गंभीरपणे तिला सांगितलं, “पोटात रक्तस्राव होतोय. दवाखान्यात अॅडमिट व्हावं लागेल. तस अविश्वासानं तिनं विचारालं, “पण डॉक्टर, मला तर काही त्रास होत नाही उलट मा व बाळ मजेत आहोत.
 “वरून कळत नसतं मॅडम!" डॉक्टर म्हणाले, “आणि डॉक्टर मी का तुम्ही?" तशी ती चूप झाली, पण तिला काही तरी खटकतं होतं. तिनं नवच्याकड प्रश्नार्थक नजरेन पाहिलं, तेव्हा त्यानं आपली चर्चा निर्विकार ठेवीत तिची नजर व पुढचं संभाषण टाळलं!
 तिला भूल देऊन डॉक्टरांनी गर्भपात केला. ते हत्या केलेले भ्रूण पाहाताना गणेश मनोमन शहारला होता. त्याच्या काळजात एक खोल चरा उमटला होता. आपण खून केला आहे, असं मनाला कुठेतरी वाटत होतं.

 पण त्यांच्या शरमिंदेपणाला स्वत: बद्दलच्या तीव्र घृणेची जोड तेव्हा मिळाली,

२० २ । लक्षदीप