पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देशमुख यांच्या एकूण लेखनविषयात चंदेरी दुनियेतले विषय बन्याच वेळा आवृत्त झाले आहेत.हिंदी चित्रपटसृष्टीतील गुरूदत्तच्या जीवनाधारित हे नाटक बेतलेले आहे.गुरू आणि प्रतिभेच्या असफल प्रेमाची ही शोकात्म कथा आहे.गुरू,प्रेरणा,प्रतिभा व अब्बास यांच्या जगण्यातून नाटकाचे आशयसूत्र उलगडते.गुरू या दिग्दर्शकाच्या आयुष्यातील चढउतार तीमध्ये आहेत.वैयक्तिक आयुष्य आणि कला यांच्या द्वंद्वात अडकलेल्या कलावंताची ही कैफियत आहे.पत्नी आणि ती यांच्या परस्परसंबंधातून दुभंग झालेल्या व्यक्तीची ही कैफियत आहे.सामाजिक नियमनांमुळे व्यक्तिमनातील उत्कट प्रेमापासून रहाव्या लागणा-या अलिप्ततेतून येणारी परात्मता तीमध्ये आहे.क्रमशः गुरू या गर्तेत कोसळत जातो व अखेरीस मद्याच्या धुंदीत कांपोजच्या गोळ्या खाऊन मरणाला सामोरा जातो.देशमुखांनी या नाटकास ‘अखेरची रात्र असे अर्थपूर्ण नाव दिले आहे.एका कलावंताची प्रेमाअभावीची तीव्र,खोलवरची घुसमट, आंतरिक वेदना प्रभावीरीत्या आविष्कृत केली आहे.चित्रपटाच्या मायानगरीतील कलावंताच्या परस्परसंबंधाच्या माहोलाचे चांगले चित्र या नाटकात उभे केले आहे.चंदेरी दुनियेतील हिंदी गाण्यांचा, संवादांचा व काव्यात्मतेचा प्रभावी वापर या नाटकात आहे.

६.


 या संग्रहात देशमुख यांनी लिहिलेल्या काही प्रवासवर्णनपर चार लेखांचा समावेश केला आहे.मेघालयातील चेरापुंजी या जगातल्या सर्वात जास्त पाऊस पडणा-या ठिकाणी भेट दिल्याचे कथन ‘चिंब चिंब चेरापुंजी' या लेखात आहे.देशमुख यांच्या प्रवासकथनातील हा एक आगळा वेगळा असा ललित अनुभव आहे.भारतीय प्रशासन सेवेत प्रशिक्षण कालावधीत त्यांनी या स्थळाला भेट दिली त्याचा अनुभव या लेखात आहे.एका बाजूला चेरापुंजीबद्दल मनात वसत असलेल्या रोमँटिक भावना आणि प्रत्यक्षातले चेरापंजी याचे विहंग दर्शन या लेखात आहे.या प्रदेशातील समूह,प्रदेश,भाषा व जीवनशैलीबद्दलची निरीक्षणे आहेत.तिथल्या सामाजिक स्थितीबद्दलची वर्णने आहेत.मातृसत्ताक कुटुंबव्यवस्थेची माहिती आहे.त्याचबरोबर निसर्ग,विविध मनोहरी रमणीय स्थळे यांचे वर्णन आहे. निसर्गनिर्मित लेणी,धबधबे,मुहांच्या सुदरतेची वर्णने आहेत.शुभ्र नितळ पाण्याचा नोहकली-काई नावाच्या धबधब्याचे वर्णन आहे.या धबधब्याला नोहकली-काई हे नाव को पडले याची माहिती देणारी करुण भयकारक अशी मेघालयी दंतकथा दिली आहे.मराठीतल्या चांगुणेच्या कथेशी नाते सांगणारी ही कथा आहे.कांचनगंगेचे अपूर्व दर्शन मात्र घेता आले नाही याची खंतही त्यांच्या प्रवासी मनाला आहे.

 श्रीलंकेतील-रामबुख्ख्याना रेल्वे स्टेशनजवळील माओया नदीकिना-यावरील पिनावाल एलफंट ऑर्फनेज या हत्तीच्या अनाथ आश्रमास दिलेल्या भेटीचे कथन एका

लक्षदीप । १९