पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हेल्प!
 त्यानंतर मी माझ्या जीवनाचा सारांश शोधण्याचा प्रयत्न पुन्हा कादंबरीच्या माध्यमातूनच करीन.... “अॅन इटरनल अनहॅपी मॅन’ (एक कायम असमाधानी माणूस) असं त्या कादंबरीचं शीर्षक मला आताच सुचतंय, तेही ‘दि सँक्रेड हिरोईन' प्रमाणं चपखल आहे...
 एका अर्थानं या तीन कादंब-या ‘ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल्सची ट्रॉयॉलॉजी' ठरतील. त्यासाठी जग मला मी गेल्यानंतरही आठवेल. त्या कादंब-या वाचक पुन्हा पुन्हा वाचतील आणि आपल्या जीवनाचा सारांश त्याद्वारे जाणायचा प्रयत्न करतील. कारण हे माझं नितांत वैयक्तिक जीवन एका अर्थानं व्यापक सर्वस्पर्शी आहे. कारण माझी श्रद्धा आहे, “व्हेन यू राईट मोअर अॅण्ड मोअर पर्सनल, इट बिकम्स मोअर अॅण्ड मोअर युनिव्हर्सल.....”
 माझं सर्वस्व ओतून माझ्यातल्या “अॅन इटरनल अनहॅपी मॅन'चा मी शोध घेईन. मदर, ही माझी माझ्यावरची पर्सनल नॉव्हेल लिहिताना टेबलावर तुझ्या व पपाच्या तसबिरी पाहात लिहीन. ज्या क्षणी माझा हा आत्मशोध पूर्ण होईल, माझी कादंबरी पर्ण होईल, तो क्षण असेल माझ्या समाधानाचा. कारण माझ्या असमाधानी जीवनाचा अन्वयार्थ मला लागलेला असेल आणि त्याद्वारे एक अपूर्व अशी कलात्मक कलाकृती निर्माण झाली असेल.
 तोच क्षण माझ्या जीवनाचा शेवटचा क्षण असेल. येस मदर, त्यानंतर मी काही लिह शकणार नाही. कारण माझं असमाधान संपलेलं असेल! मी त्यावेळी पपांच्या पिस्तुलानं स्वत:चा शांतपणे व समाधानानं शेवट करून घेईन. असं समाधान कदाचित तुलाही मरताना लाभलं नसेल. मी धैर्यानं त्यावेळी सत्याला जरूर सामोरं जाईन, पण ख्रिस्ताला खचितच शरण जाणार नाही. कारण तो तर केवळ देवदूत होता. जगनिर्माता नव्हता. मी तर कलावंत, लेखक, शब्दसृष्टीचा. ईश्वर! नवं निर्माण करणारा. त्याच्याहन श्रेष्ठ, त्याला का शरण जाऊ? मी माझा शेवट माझ्या मनानं ठरवून करेन. फॉर देंट, फरगिव्ह मी मदर!
 येस मदर, मी तुला ठामपणे आजच सांगू शकतो की माझ्या जीवनाचा शोध घेणारी आत्मचरित्रात्मक कादंबरी पूर्ण होणारा क्षण माझ्या जीवनाचा अंतिम क्षण असेल!

 कारण....? मी जे जीवन जगलो, तो पपांचा वारसा आहे, त्यांची दिशा आहे आणि त्यातलं असमाधान तुझे आहे आणि अस्वस्थता ही माझी आहे. एक कलावंत म्हणूनः मी जर जीवन पणास लावून, अनुभव घेऊन लेखन केलं असेल तर हाच माझा शैवट योग्य ठरणार आहे. या कादंबरीचा शेवट ‘अॅन इटरनल अनहॅपी मॅन' पिस्तुलाद्वारे आत्महत्या करतो असा मी दाखवेन. हा माझा रचलेला प्लॉट आहे आणि तोच माझा

लक्षदीप । १९३