पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भानातूनही लिहिला गेला पाहिजे. अशा प्रसंगी लेखकावर बाहेरचे अनेक दाब असतात. जवळपास आठेक वर्षाच्या कष्टसाध्य व्यासंगाने ही कादंबरी आकाराला आलेली आहे.यासाठी त्यांनी इतिहास, धर्मशास्त्र,संस्कृती व समकालीन घडामोडींवरील विपुल संदर्भसाधने वापरली आहेत.विशेषत: या कादंबरीत अफगाणिस्थानातील समूहदर्शन आणि तेथील जीवनरीतीचे फार बारकाईने चित्रण आले आहे. एका अपरिचित अशा मुस्लीम जगाला सजीव करण्यासाठी लेखकाने फार मेहनत घेतलेली आहे.एका विशिष्ट संस्कृतीच्या जीवनचित्रणासाठी धर्म व संस्कृतीचा मोठा पट उभा केला आहे. तेथील वातावरण निर्मितीसाठी व समूहदर्शनासाठी उर्दू-फारसी-पुश्तू भाषाचिन्हांचा मोठा वापर यामध्ये आहे.ओघवत्या व प्रवाही अशा गद्यलयीत कादंबरीतील कथन पुढे सरकते.एक धगधगता राजकीय दहशतवादाचा इतिहास इथे जिवंत केला आहे.
 एकूणच लक्ष्मीकांत देशमुख यांचे कादंबरीविश्व हे विविधस्वरूपी आहे.तीमधून नवी आशयसूत्रे प्रकटली आहेत.प्रशासन जीवनातील जीवनचित्रण व राजकीय जाणिवांचे चित्रण ही त्यांच्या कादंब-यांची महत्त्वाची उपलब्धी आहे.स्वत:च्या मूल्यविषयक धारणेतून या कादंबरीतील जाणीवसूत्रे आकाराला आली आहेत.तसेच इन्किलाब विरुद्ध जिहाद' या सुदीर्घ अशा बृहद कादंबरीत आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा हाताळलेला विषय हा मराठी कादंबरीला नवा आहे.

५.


 देशमुख यांची दोन नाटके प्रकाशित आहेत.दूरदर्शन हाजीर हो' हे देशमुखांचे १९९९ साली प्रकाशित झालेले बालनाट्य,समकाळातील एका भेडसावणाच्या प्रश्नाधारित हे नाटक आहे.लहान मुले इडियट बॉक्स नामक टी.व्ही.च्या आहारी गेल्यामुळे किती गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत ते या नाटकातून सांगितले आहे.मराठवाड्यातील सेलू गावात या नाटकाचे कथानक घडते.या शतकातल्या लहान मुलांच्या जीवनातील टी.व्ही.रूपी सर्वात मोठ्या शत्रूने कसा धुमाकूळ घातला आहे.त्यासाठी नाटकात एक अभिनव अभिरूप न्यायालयात टी.व्ही. विरोधात खटला चालू ठेवला.तमाशातील बादशाह व दिवाणजी वकिलांची भूमिका धारण करून हा प्रश्न चचिला आहे.टी.व्ही. व सिनेमांच्या आहारी गेलेल्या मुलांची व त्यांच्या पालकांची मानसिकता,त्याचबरोबर समांतर काही अल्पशी मुले ज्ञान मनारंजनासाठी आवश्यक तेवढा टी.व्ही. पाहणारी मुले आहेत.सर्वांनी एकत्र येऊन संस्कारक्षम तरुण पिढी घडविण्यासाठी एकसूत्री काम करायला हवे असा संदेश दिला आहे.एका आदर्शवादी भूमिकेतून या प्रश्नाकडे या नाटकाद्वारे पाहिले आहे.

 देशमुख यांचे ‘अखेरची रात्र' हे नाटक २०१४ साली प्रकाशित झाले.दोन अका या नाटकात पडद्यावरील एका कलावंताची शोकात्मकथा सांगितली आहे.

१८ । लक्षदीप