पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते जिवाचं मोल देऊन. सर्वस्व पणाला लावून. जितक्या उत्कटतेनं तीन दशकं माझं लेखन बहरत होतं, तेवढ्याच तीव्रतेनं माझं जगणं जखमी व रक्तबंबाळ होत होतं. मनाच्या एका कोप-यात मदरची शापवाणी सदैव वेदना देत होती. त्यामुळे माझं माणूसपण असमाधानी होतं. पण लेखकीय जीवन लख्ख उजळून निघालं होतं.
 आज सकाळच्या संडे प्रेअरनं मन थोडंसं शांत व समाधानी झालं होतं.
 दारुण अपेक्षाभंगामुळे त्यावेळी क्रुद्ध होत मला दिलेला शाप सोडला तर मदर ही जीवनभर प्रेममय कारुण्यमूर्ती बनूनच राहिली. तिनं नर्सिंग व संगीतामध्ये प्रावीण्य संपादून या परगण्यातील लोकांची ख्रिस्ती धर्माच्या आज्ञेप्रमाणं मनोभावे सेवा केली होती. तिची वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी बातमी व छायाचित्रं मला तिच्या उदात्ततेची जाणीव करून द्यायची. त्यामुळं माझं असमाधान अधिकच तीव्र व्हायचं. हा अस्वस्थ आणि असमाधानी जीवनाचा भणंग मार्ग स्वत:हून स्वीकारला होता. तो एका अव्यभिचारी निष्ठेनं - की जगणं आणि लिहिणं अलग नसतं.
 माझे पपा असंच अस्वस्थ पण वादळी जीवन जगले. एका जोगिणीसारख व्रतस्थ दैनंदिन धार्मिक जीवन जगणा-या स्त्रीबरोबर त्यानी आयुष्यभर संसार केला. त्यांना जीवनातली कोणतीही बाब त्याज्य नव्हती. अगदी नव्या नव्या नशांचाही ते शोध घ्यायचे. जगण्यातला कोणताही भलाबूरा अनुभव त्यांना वर्त्य नव्हता. पपांनी मदरला संसारात कसं निभावून नेलं असेल? तो का संसार होता? दोन विरुद्ध जीवनधर्म मानणाच्या व त्याप्रमाणं प्रामाणिकपणे जगणाच्या त्या जीवांना एकत्र बांधून ठेवणार एकहीं सूत्र मला शोधूनही आजवर सापडलं नव्हतं.
 तरीही पपांनी तिला कधी दूर लोटलं नव्हतं. ते तिचा प्रच्छन्न उपहास करात, तिच्या धर्मनिष्ठ जीवनाची यथेच्छ टिंगल-टवाळीही करीत. अधिकाधिक वेळ शिकार, नशा, सागरी जीवनात व जंगलात व्यतीत करीत, तरीही ते तिच्यापासून कधी अलग झाले नाहीत.
 एक लेखक म्हणून त्या दोघांचे परस्परांना बांधलेलं विसंवादी व कोणतेच समान धागे नसलेलं सहजीवन मला आव्हानात्मक वाटायचं. सेक्सबद्दल पपा मोकळेढाकळ होते. त्यांच्या अनेक मैत्रिणी होत्या, लिव्ह इन रिलेशनशिप्स होत्या. अशाच एका रिलेशनशिपमधून माझ्या सावत्रभावाचा जन्म झाला. पण त्यांनी आपल्या बायकोला । माझ्या मदरला कधी सोडलं नाही. ब्रिटन - युरोपात घटस्फोट आम असतानाही त्याना तो विचार कधी मनात आणला नाही. मदरला पपांचं अनिर्बध जीवन पापमय वाटायच. त्यांनाही ती शिव्याशाप द्यायची. पण त्यांचं तिच्यावरचं प्रेम काही अजबच हात: कितीही विचार केला तरी आजवर त्याचा मला पूर्णाशानं वेध घेता आला नाही.

 खरं तर पपांना तरी मी कुठं पूर्णाशानं जाणलं होतं? कारण त्यांचा शेवट मा आजही अस्वस्थ करतो. त्यांच्या आत्महत्येचा काही उलगडा होत नाही. वरकरण।

१८८ ॥ लक्षदीप