पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. कृपया त्याचा तुम्ही अवमान करू नका."
 त्यानंतर जवळपास मी तीन आठवडे चर्चमध्ये होतो. पण फादरनी शिक्षा म्हणून व पापाचं परिमार्जन व्हावं म्हणून मला सर्वांपासून अलग एका खोलीत, जवळपास बंदिवान करीत, एकांतवासात ठेवलं होतं. मी आत्मपरीक्षण करावं व येशूला शरण जावं म्हणून!
 मी त्या सक्तीच्या एकांतवासात आत्मपरीक्षणच करीत होतो. स्वत:ला, स्वत:च्या विचारांना तपासून पाहात होतो. तिथं मला साक्षात्कार झाला की, लेखन ही माझी अटळ अशी नियती आहे.लेखक म्हणून आपण ननैतिक आहोत. जीवनातही सुष्टतादुष्टता तसंच धैर्य-क्रौर्य, हिंसा अन् करुणा या सा-या आदिम मानवी प्रेरणांची जगताना होणारी गुंतागुंत व व्यामिश्रतो मला जाणून घ्यायची आहे. या जगातले जंगल, सागर, पशु, पक्षी आणि मानवी जीवनातली पांढरी-करडी व काळी छटा, पवित्र व उदात्तता, मानवातलं दानवत्व आणि सैतानी मनातली उदात्तत्ता लेखनातून आविष्कृत करायची आहे, तीच माझी नियती आहे.
 माझ्या या निर्मितीक्षम जीवनात चर्च, त्याचे बंदिस्त व कर्मठ जीवन आणि मख्य म्हणजे माणूस हेच पापाचं मूळ असून, त्याचे परिमार्जन करीत जगणं बसत नव्हतं. ते जीवन माझ्यासाठी अनैसर्गिक म्हणूनच लादलं गेलं होतं. त्यात आपल्याला गुदमरल्यासारखं होतंय! त्यातून मुक्त व्हायचं आहे, नव्हे झालंच पाहिजे, असं मला वाटत होतं.
 मी आज चर्चमधून पळून घरी आलो होतो, मदरला कसं तोंड द्यायचं, हा प्रश्न होता. पण पपा मला सांभाळून व समजून घेतील हा विश्वास होता.
 माझे पपा जातिवंत शिकारी व दर्यावर्दी होते. निसर्ग नामक पुस्तक सहजतेनं समरसून वाचणारे ते जीवनवाचक होते. त्यांच्या हातात एक तर बंदूक असायची वा घोड्याचा लगाम. दोन सफरींमध्ये काही काळ ते घरी असायचे मदरसोबत, बस्स! त्यांना चेकबुकवर सही करण्यासाठी सुद्धा हातात क्षणभर पेन धरणं फारसं आवडत नसे. त्यामुळे ते फारसं वाचत नसत. पण माझी पहिली कथा त्यांनी माझ्याकडून आवर्जून वाचून घेतली होती. थरारून जात मला घट्ट मिठी मारून ते म्हणाले, “माय सन, यू आर ग्रेट! आय अॅम रिअली आऊड ऑफ यू. हे फारच अनोखं व जिवंत वाटतंय. मला ते माझं जीवन, माझं जगणं वाटतंय. हे जर साहित्य असेल तर बेटा, खरंच तू एक दिवस नक्कीच मोठा लेखक होशील. गॉड ब्लेस यू!"
 माझ्या अपेक्षेप्रमाणं पपांनी चर्चमधून पळून आलो तरी माझं स्वागतच केलं होतं. कदाचित त्यांना ते अपेक्षित असावं. त्यांना मदर मेरीचा मला ‘फादर' बनविण्यासाठी व्हॅटिकन सिटीला पाठवण्याचा निर्णय साफ नापसंत होता.

 पण मदरनं जे अकांडतांडव केलं, अक्षरश: थयथयाट करीत मला जे शिव्याशाप

लक्षदीप ॥ १८५