पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/182

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आज जिवंत असती आणि मला मनापासून प्रेअर करताना तिनं पाहिलं असतं तर तिला किती बरं वाटलं असतं!
 मदर, तू मला जन्म दिलास व नऊ महिने उदरात आणि नंतर सोळा वर्षे वाढवलंस, त्या तुझ्या ऋणातून मी आज मुक्त होत आहे. पुन्हा कदाचित कधीच मी चर्चमध्ये जाणार नाही....."
 मी हॉटेलच्या वातानुकूलित सूटमध्ये विषण्णपणे पहुडलो होतो. सायंकाळची लंडनची फ्लाईट होती. आता मला अक्षरश: काहीच काम नव्हतं. खरं तर, लोकल टी. व्ही चॅनेल, रेडिओ व वृत्तपत्रांना माझ्या मुलाखती हव्या होत्या, पण मी त्या सा-यांना नकार दिला होता. आज मला कुणाशीही संवाद साधायचा नव्हता. कारण मी अस्वस्थ होतो आणि माझ्या बेचैनीचा, अस्वस्थतेचा केंद्रबिंदू होता मदर! मला राहून राहून तो प्रसंग आठवत होता, ज्या दिवशी मी घर सोडलं होतं त्याच दिवशी मी रोमहून पळून आलो होतो.
 “मदर, फर्गिव्ह मी! पण मला तिथं राहणं खरंच शक्य नव्हतं. त्या धार्मिक जीवनासाठी माझा जन्म नाहीय.”
 माझ्या या स्पष्टोक्तीनं मदरवर जणू मर्मातक प्रहार केला होता. ती तळमळून म्हणाली, "बेटा, नक्कीच फादर म्हणतात तसा तुझ्या मनाचा त्या पापी सैतानानं ताबा घेतलाय. नाही तर माझा मुलगा असा व्हॅटिकन सिटीमधून फादरला न सांगता सवरता पळून आला नसता. का असा तू पळून आलास?"
 "मदर, कसं सांगू तुला? ते तुला कधीच पटणार नाही.' मी म्हणालो, “अगं, मला मनमुराद जीवन जगायचं आहे. हे विशाल जग जवळून पाहायचं आहे...."
 "तुझ्या पपांसारखं अनिर्बध - स्वैर...?"
 “खरं सांगायचं झालं तर, येस मॉम! उजेड आणि अंधार, सुष्ट आणि दुष्ट, हिंसा, क्रौर्य, साहस- सान्या आदिम भावना व निसर्गप्रेरणा जाणून घ्यायच्या आहेत. त्या साहित्यात साकार करायच्या आहेत. अधिक स्पष्ट सांगायचं तर लेखक ही माझी ओळख आहे व लेखन हीच माझी नियती...."
 व्हॅटिकन सिटीच्या त्या पवित्र, पण मला न पटणा-या व म्हणूनच खोट्या वाटणा-या, उदास कळकट नियमांनी करकचून बांधलेल्या व जीवन हे पापाचं मूळ आहे असं समजून कठोर देहदंडयुक्त जीवन जगणाच्या वातावरणात मला राहाणं एका महिन्यातच असह्य झालं होतं. तिथून मी चक्क पळून घरी आलो होतो.

 रानावनात आणि माणसांपेक्षा वन्यपशूत आणि सागराच्या सान्निध्यात रमणाच्या, बलदंड व रसरसतं जीवन जगणा-या माझ्या पपांनी दोन्ही बाहू फैलावून माझं स्वागत केलं. मला मिठीत घेत म्हटलं, “ये बेटा, तुझं स्वागत असो! अगदी वेळेवर परत आलास. गेली दोन वर्षे आपण सागर सफरीचं जे स्वप्न पाहिलं होतं ते यंदा पूर्ण

१८२