पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तसं वाटतं नाही. घटस्फोट जर नामुष्की असेल तर ती दोघांसाठी पण असावी, असते. आपणच का स्वत:ला अपराधी समजायचं? इथं तर सारा दोष त्याचा आहे. मी का त्याची स्वत:ला शिक्षा करून घेऊ? तिनं शांतपणे कसलाही सवाल न करता त्या कागदावर सही करून दिली. संदीपला तिच्या शांतपणाचं भय वाटलं. ते त्याच्या नजरेत उमटलं. ते ओळखून ती म्हणाली, भय्या, घाबरू नकोस, इजा, बिजा झाला, पण आता तिजा होणार नाही. किंबहुना असं काहीसं मी कल्पिलं पण होतं, म्हणून धक्काही फारसा बसला नाही. खरं सांगु, श्रीकांत इज नो मॅच फॉर मी. त्याला माझं महत्त्व नाही. जो महत्त्व देतो रक्ताला, जन्माला व तथाकथित खानदानीला, ते माझ्या लेखी फोल आहे. नारायण सुर्त्यांच्या कवितेप्रमाणे मी सूर्यकुलातील लोकांपैकी एक आहे. मला त्याच्या नावाची गरज नाही. बाबांचं नाव आहे, ते पुरेसं आहे. आणि ते अभिमानानं मिरवावं असं आहे. मला बाकी सारं फिजूल वाटतं. या नव्या कणखर कमलचा निर्माता तू आहेस भय्या. तू नारायण सुर्व्याचं जीवनरहस्य सांगून मला धीट बनवलंस. मी आता स्वत:ला एक निखळ माणूस समजते वे एक प्रखर स्त्री...." संदीप तिच्याकडे थक्क होऊन पाहात राहिला. “आता माझ्या पोटात एक जीव वाढतो आहे. बीज त्याचं आहे, पण क्षेत्र माझं आहे. ख-या अर्थानं तो माझा आहे. त्याच्या नावापुढे मी माझं नाव त्याला पसंत असेल तर लावेन, नाही तर कुणाचेही नाव तो लावणार नाही. त्याच्यावर असे संस्कार करीन की त्यानं फक्त माणूसपण आयुष्यभर जपावं. बस् ... आणि उद्या सुव्र्यांप्रमाणे ताठ मानेनं म्हणावं... "आकाशाच्या मुद्रेवर अवलंबून राहिलो नाही उगीच कुणाला सलाम ठोकणे जमलेच नाही पैगंबर खूप भेटले, हेही काही खोटे नाही स्वतःलाही उगीचच हात जोडताना पाहिले नाही कळप करून ब्रह्मांडात हंबरत हिंडलो नाही स्वत:लाच रचित गेलो, ही सवय गेलीच नाही." 04 - १७८ । लक्षदीप