पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांचं लग्न लावून दिलं. | यावेळी मात्र त्यांनी आणि संदीपनं धोरणीपणानं तिचं जन्मरहस्य श्रीकांतपासून लपवून ठेवलं होतं. मागेपुढे यथावकाश सांगावं. तोवर परस्पर प्रेमात बांधले गेलेले जीव एकमेकांना नीट समजून घेतील व सारं काही सुरळीत होईल ही त्यांची प्रामाणिक भावना होती. | पण झालं विपरीत. बाबांच्या जवळच्या मित्राला हे कमलचं जन्मरहस्य ठाऊक होतं. त्यांनी वकील म्हणून कमलला कायदेशीर दत्तक घेण्यास मदतही केली होती. त्यांचा मुलगा हा श्रीकांतचा वर्गमित्र निघाला. त्यानं सहज मित्रांमध्ये गप्पा मारताना कमलच्या जन्मरहस्याचा स्फोट केला आणि श्रीकांत बिथरून गेला. । | कमलवर निरतिशय प्रेम करणाच्या श्रीकांतसाठी आता कमल एकाएकी अस्पृश्य ठरली होती. त्यानं बेभान होत तिच्या अंगावर धावून जात म्हटलं, “तू तू मला फसवलंस. तुझ्या बापानं कुठल्या तरी गंद्या गटारीचा किडा माझ्या पदरी बांधला. ओ नो, मला ही कल्पनाच सहन होत नाही. माझा रक्ताच्या शुद्धतेवर आणि खानदानी गोष्टींवर विश्वास आहे.” एवढा उच्चशिक्षित केमिकल इंजिनिअर असलेला श्रीकांत एवढ्या बुरसटलेल्या व खुळचट विचारांचा असेल, असं तिला वाटलं नव्हतं. खरं तर तिला हे माहीतच नव्हतं. ती आपली समजून चालली होती की, बाबांनी त्यालाही आपलं जन्मरहस्य सांगितलं असणार. पण तिच्या सुखासाठी व तिनं केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे व्यथित होऊन त्यांनी ते न सांगण्याचा निर्णय घेतला असावा. पण त्याचा असा विपरीत परिणाम होईल व एवढा प्रचंड उद्रेक होईल असं तिला वाटलं नव्हतं. श्री, मला खरंच माहीत नव्हते की, बाबांनी तुला माझं जन्मरहस्य सांगितलं नव्हतं ते. अरे, जन्म का आपल्या हाती असतो? पण संस्काराने मी देसाई घराण्याची आहे. सांग, या वर्षभरात माझ्यात काही खोट आढळून आली? तो थोडा जरी भानावर असता तरी त्याला निरुत्तर व्हावं लागलं असतं. कालपर्यंत तिच्याभोवती पिंगा घालत प्रेमकूजन करण्यात तो थकत नव्हता. पण एका रहस्यस्फोटानं तो पार बदलून गेला होता. | खरंच का माणसे एवढी रूढी-परंपरेच्या ओझ्याला जळवासारखी चिकटून असतात? रक्ताची शुद्धता, रिवाज महत्त्वाचे; मात्र शिक्षण, संस्कार व नीतिमत्ता यांना काहीच स्थान नाही? शिक्षणानं माणूस बदलतो, विचार अधिक प्रगल्भ होतात म्हणे. हिंदू पुरुष मात्र आजन्म सनातनीच असतो की काय? कमल त्या रात्री अक्षरश: मिटून गेली. एक शब्दही तिला बोलावासा वाटला नाही. बोलूनही फायदा नव्हता. कारण श्रीकांत एवढा बिथरलेला होता की, त्याच्यातलं माणूसपण संपलं होतं आणि त्यांच्या सहजीवनाच्या ठिक-या ठिकन्या झाल्या... १७६ । लक्षदीप