पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुखरूप परतले, तेव्हा रडत रडत आपण त्यांना आवेगानं मिठी घातली. तेव्हा ते माझ्या लेखी पिताच होते...। | मग आपण अशा बेचैन, उदास का आहोत? मनातून ही जाणीव का जात नाही की जन्मदात्रीस आपण नकोसे होतो. आपण निश्चितच पापाचे फळ होतो. हे जगळं उपरं आहे. दयेचं, करुणेचं आहे. ख-या प्रेम व हक्काचे नाही. त्या रात्री टी. व्ही.वर तीही सर्वांसोबत आग्रहाला बळी पडून सिनेमा पाहात होती. बाबांचा त्यांच्या जमान्यातला आवडता एक कलात्मक चित्रपट ‘गर्म हवा' लागला होता. सिनेमा पाहाताना त्यातली गीता सिद्धार्थ मनगटाच्या रक्तवाहिन्या कापून आत्महत्या करते, ते दृश्य पाहून कमल कमालीची उत्तेजित झाली होती आणि सारे झोपी गेल्यावर एक पिसाट भावना तिच्या मनात घर करून राहिली की, आपलं जगात येणं हाच मुळी एक अपघात होता. तो कदाचित विधात्यालाही मंजूर नव्हता. हे जगणं बांडगुळाचं उपरं जगणं आहे. नो - मला असं जगणं मंजूर नाही. मला - मला या जगात राहण्याचा काही अधिकार नाही. तिनं सिनेमाप्रमाणे संदीपभय्याच्या दाढीच्या सामानातील एक ब्लेड काढली व डाव्या मनगटाची रक्तवाहिनी कापली. पण मग आपलं रक्त पाहून तिलाच भोवळ आली, भेदरून जिवाच्या आकांताने तिने टाहो फोडला, “आई, बाबा, भय्या.... | तिला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आलं. सुदैवाने तिने घेतलेला ब्लेड वापरलेली असल्यामुळे बोथट होती, म्हणून फारसा रक्तस्राव झाला नव्हता. पण आई, बाबा व संदीप हादरून गेले होते. “धिस इज ए केस ऑफ अॅक्युट डिप्रेशन लीडिंग टू अटेम्प्ट टू स्युईसाईड. डॉक्टर सांगत होते, “पण मग तिलाच भीती वाटली, कदाचित जगण्याची आशा जागृत झाली असावी. म्हणून तिने हाक दिली, हे तुमचं सुदैव. ती तुमच्या हाती त्यामुळे लागली. तिनं असं का केलं असावं? तुम्ही फ्राईडचं नाव ऐकलं असेलच. त्यांच्या मते प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात जीवन व मृत्यू याचं प्रतिनिधित्व करणा-या परस्परविरोधी शक्ती वास करीत असतात. “इरॉस' ही शक्ती जीवनाचा मूल स्रोत आहे. तर थानाटॉस (हे दोन्ही ग्रीक प्रतीक आहेत.) ही विनाशाकडे ओढणारी प्रेरणा किंवा शक्ती आहे. जीवनातील ध्येयं साध्य होतील की नाही, इच्छा अपु-याच राहणार काय, अशा निराशात्मक विचारांनी मनातला थानाटॉस जागी होते. कमलला तिचं जन्मरहस्य कळल्यामुळे सर्व बाबतीत उजवा असूनही वरपक्षांचे नकार झोलावे लागले. त्या स्वप्नभंगाच्या अस्वस्थ गडद निराशेमध्ये ती असताना तिला जेव्हा तुम्ही तिचं जन्मरहस्य सांगितलं तेव्हा ती हादरली आणि तिला ती स्वत:लाच नकोशी वाटत गेली. त्यातून हा आत्महत्येचा प्रयत्न तिने केला. १७४ । लक्षदीप