पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुण, स्वर आणि शिक्षण या चारही आघाड्यांवर तिचं पारडं भारी आहे. ज्याला ती मिळेल तो नशीबवान खरा, पण...!' “पण, पण काय बाबा? कापच्या आवाजात कमलने विचारले, “मला भीती वाटते हो मला - मला.. “शांत हो पोरी आणि मन घट्ट कर. हे आज ना उद्या तुला कळणारच आहे. ते तुला सांगणं कधी तरी भाग आहे. मग आजच का नको? बाबा म्हणाले, “हे बघ, मी जे आज सांगणार आहे, त्यानं आपल्या नात्यामध्ये फरक पडणार नाहीय; पण हे सत्य आहे की, तू आमच्या रक्तमांसाचा गोळा नाहीस. मात्र प्रेम, घामाचा आणि वात्सल्य, ममतेचा वारसा आहेस. “मी, मी... म्हणजे म्हणजे मला असं असं म्हणायचं आहे की...' कमलचे शब्द फुटतच नव्हते. पण आतून काहीतरी पायाखालची जमीन काढून घेणारं व आपली रुजलेली मुळं उखडणारं असं काहीतरी बाबा सांगणार आहेत, याची अस्पष्टशी जाणीव होत होती आणि मन नैराश्याच्या, उदासीनतेच्या डोहात बुडत आहे असा भास होत होता. “हां बेटा, तुला कदाचित मला काय म्हणायचं आहे ते समजलं असावं. बाबा म्हणाले, “आम्ही तुला अनाथ आश्रमातून एक वर्षाची असताना आणले आहे. संदीपला बहीण हवी होती व तुझी आई त्याच्या जन्माच्या वेळीच मरता मरता वाचली होती. म्हणून तिला बाळाला पुन्हा जन्म देणं परवडणार नव्हतं. धोक्याचं होतं म्हणून... आई”, तिच्याकडे झेपावत कमल म्हणाली, “तू तू सांग, हे हे खोटं आहे? तुझा वत्सल स्पर्श, माझी तुम्हाबद्दलची ओढ ही तुझ्या गर्भात न वाढताच आली आहे? तिला थोपटीत आई म्हणाली, “पोरी, शांत हो. या वस्तुस्थितीनं काय फरक पडतो? कृष्ण जन्म दिलेल्या देवकीपेक्षा यशोदेचा अधिक खरा पुत्र होता... तू माझी आहेस. आमची आहेस. बेटा. “हो कमल, भाऊबीज व राखी आठव आणि सांग, मी तुझा भाऊ नाही? संदीपभय्या नाही? त्या रात्री ती क्षणभरही स्वस्थ नव्हती. चुपचाप काही न बोलता कूस बदलत होती. बाजूच्या खोलीत संदीप व आई - बाबा किती वेळ तरी जागे होते. दस-या दिवसापासूनची कमल वेगळीच झाली होती. उदासीनतेची लेणी शृंगारलेला व अलिप्ततेची कवचकुंडलं ल्यालेली. पराभूत कर्णाप्रमाणे एकाकी. तिचं सदैव चिवचिवणं, आईभोवती पिंगा घालीत अगदी छोट्यातली छोटी घटनाही तिला रंगवून सांगणे, सदैव लकेरी घेत गुणगुणणं आणि रेडिओ श्रीलंकावरील सकाळी ‘भूले बिसर गीत' कार्यक्रमातील आवडलेलं गाणं दिवसभर वेळीअवेळी म्हणणं... सारं सारं संपलं १७२ ॥ लक्षदीप