पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुन्हा तिला खुदकन हसू येतं. डॉक्टर किती छान प्रभावी बोलतात. त्यांनीच तर तिला विश्वास दिला आहे की, ती बरी झाली आहे. तिचं कमकुवत मन व त्याचे मनोविकार आटोक्यात आले आहेत. तिच्यात मुळातच ‘फायटिंग स्पिरीट' आहे; ते जागृत झाले. आता तिला कधी नैराश्य येणार नाही. किती छान, पण सोपं बोलतात डॉक्टर. सारे मनाचे आजार चुटकीसरशी पळवून लावतात. हो, त्यांची ख्याती आहे। म्हणे. म्हणे काय, माझा अनुभवच सांगतो की, ते सारं खरं असलं पाहिजे. मी, मी आता पूर्ण बरी झाली आहे ना. त्याचं कारण डॉक्टरांचा हा संगीतमय उपचार किंवा दुसरं काही असू दे, पण सनईचे सूर या पहाटे किती आनंददायी व प्रसन्न वाटतात, एक सुरेल सम साधून विलक्षण नजाकतीनं आलाप घेत पूरिया राग शहनाईवर बिस्मिल्ला खान यांनी पूर्ण केला होता. टेप थांबला होता. कमलने उत्स्फूर्त दाद दिली. वाऽऽबहोत खूब! क्या कहने?” नेहमी चिडखोर भाव चेह-यावर वागवणाच्या व म्हशीसारख्या नजरेनं पाहणा-या नसेने खेकसत दिलेला चहाही तिला चवदार वाटला व तिने आपल्या मधुर आवाजात म्हटले, “बँक्स सिस्टर...' ती अवाक होऊन परत जाताच कमलला परत हसू फुटलं... आपल्या डोळ्यात पाणी आल्याचे तिला जाणवले... हे अश्रू पण किती आनंदाचे आहेत.. आपला श्रीकांत तसा रसिक आहे. आता या क्षणी आला तर तो ते ओठाने टिपून घेत कानात उष्णा श्वास सोडत विलक्षण मार्दवाने म्हणेल, “वेडे, मी आलोय तुला घेऊन जायला... आता पुन्हा कधी अश्रू दिसणार नाहीत या मीनाक्षी नेत्रात... मी वचन देतो.” खरंच असं होईल? आज श्रीकांत येईल आपल्याला न्यायला? गाडीवानानं बैलांच्या पुठ्यावर कडाडून आसूड ओढावा व त्यांनी तुफान पळत सुटावं, तसं या प्रश्नांच्या फटका-यानं ती चौफेर उधळली आणि मन भरून आलं, छाती जडावली व क्षणार्धात निस्त्राण होत तिनं पलंगावर स्वत:ला झोकून दिलं. उशीत ताड खुपसलं. जिवाच्या करारानं बंद ओठाआड हुंदके जिरवत तिची काया गदगदत राहिली. | काही वेळाने उशी चिंब केल्यानंतर ती रिती-कोरडी होऊन गेली. एक सुन्न ग्लानी तिला जाणवत होती. पण विचार व संवेदना तल्लख आहेत व आपलं भान कायम आहे, हे जाणवताच तिला हायसं वाटलं. पहाटेपासूनची सारी लक्षणं डिप्रेशनच्या कारापासून आपली मुक्तता झाली आहे, याची ग्वाही देत होती. डॉक्टरांनी काही उगाच वृथा विश्वास दिला नाही. मी खरंच बरी झाली आहे. मग श्रीकांत का येत नाही मला घ्यायला? । या प्रश्नाला उत्तर देताना तिचं मन जणू तिलाच ग्वाही देत होत. “कमल, धीर लक्षदीप ॥ १६९