पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सरपंचांची हताश प्रतिक्रिया.
 मास्तरांना तो नोकरी सोडून परत मुंबईला जात आहे हे समजलं होतं, तेव्हा ते कडाडले, “तुम्ही पण साहेब, पळपुटे निघालात... खेडेगावचं... ग्रामीण भागाचं उघडेनागडं वास्तव तुम्ही स्वीकारू शकत नाहीत... तुम्ही मुर्दाड नाही... संवेदनशील आहात म्हणून त्रास करून घेता, बेचैन होता.... पण तुमच्या संवेदना आम्हाला दिलासा देऊ शकत नाहीत... म्हणून वांझोट्या आहेत त्या, वांझोट्या...
 अक्षय मान घालून ऐकत होता.. मास्तराचं वाक्ताडन त्याला वर्मी घायाळ करीत होतं, पण प्रतिवाद करायचं बळ नव्हतं आणि मुख्य म्हणजे तोंड नव्हतं. त्यांचा एक एक शब्द कटू असला तरी खरा होता....
 “मला मोरया गोसावीचं दर्शन घ्यायचं आहे. चला, आपण देवळात जाऊ या..' अक्षय म्हणाला. तसे सारे गावकरी एकदम शांत झाले व त्यांनी मान खाली घातली. अक्षय चरकला, म्हणाला “असे तुम्ही गप्प का? काय झालं?”
 मास्तर दीर्घ सुस्कारा टाकीत म्हणाले, “तुम्ही गेल्यावर दुस-याच दिवशी त्यांना सदेह आम्हा सर्वांच्या साक्षीनं या पूर्णामायेत जलसमाधी घेतली. वरच्या काठाला पाच मैलावर मोठा पूल आहे, त्यावरून त्यांनी उडी टाकली. खरे साधू संन्यासी होते ते. त्यांचा देहही हाती आला नाही..."
 अक्षयला गलबलून आलं होतं. त्याला मोठ्याने ओरडून म्हणावंसं वाटत होत. नाही, हा देहत्याग नाही. मी त्यांना मारलं - मी मी मारलं.... त्यांची श्रद्धा, त्याचा नि:संगपणा मी त्या रात्री त्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारत खरवडून काढला. त्यांचं शांत - नि:संग मन प्रथमच संदेही, साशंक बनलं असावं, त्यांना श्रद्धाहीन जगण एक पळही मंजूर नसावं. कारण गावासाठी ते जगण्याचं श्रद्धास्थान होते! म्हणून म्हणून असेल कदाचित - त्यांनी देह त्यागला...."
 शिवमंदिरात आल्यावर तो सर्वांना म्हणाला, “बंधूंनो, आपण जावं. मी इथे थोडावेळ बसेन. मन शांत झाल्यावर मी परत परभणीस जाईन. मला सोबतीची गरज नाही. प्लीज-"
 मोरया गोसावीविना ते देऊळ भकास, प्राणहीन, काजळी, धरल्याप्रमाणे भासत होत.
 “हे भगवान, मी कदाचित प्रथमच व अखेरची प्रार्थना करतोय. तुझ्यापुढे हात

जोडतोय. मला क्षमा कर! पण मला, मोरया गोसावीला विज्ञाननिष्ठ व तर्कशुद्ध प्रश्न माझ्या मते असलेले, विचारून त्याच्या श्रद्धांचं व जीवननिष्ठेचं भंजन करायचा काय अधिकार होता? मी तामुलवाडीचं संकट पुनर्वसन करून सुटणं शक्य असले तरी सोडवू शकत नाही. कारण मी फार मामुली अधिकारी आहे. पण अशाही कुंठित अवस्थेत निसर्गाच्या अस्मानी लहरीवर जगताना गावक-यांच्या श्रद्धेचं बळ होतं मोरया गोसावी... त्याचं दु:ख शांत करणारं व जीवन-मरणाला अध्यात्माचा स्पर्श देत खोट,

१६६ । लक्षदीप