पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहेस... निवड तुझी आहे - त्यात शिरायचं की माघारी वळायचं!” “महाराज, तुमचं इथलं निस्संग वागणं, आज दुपारची कृती मला खरंच नाही समजत आणि समजली तरी नाही पटत. तुम्ही तामुलवाडीकरांना वाटणारी जीवनाची, आय मीन पाणी वा उदकाची भीती घालवू शकत नाहीत की पुराच्या अस्मानी संकटातून त्यांना वाचवू शकत नाहीत. फार तर तुम्ही त्यांना मरताना शांती देता, पण जीवन खचितच नाही. ते अभागी जीवनही मुळातच दैववादी असल्यामुळे मरताना आत्मबळासाठी तुम्हाला शरण जातात. त्यांचं हे मरण शांत, समाधानी नसतं, तर बेमतलबी व भौतिक अविकासातून उद्भवलेलं, मानवनिर्मित असतं... त्याला आम्ही जसे जबाबदार आहोत, तसेच तुम्हीही त्यांना शांतपणे मरणाची वाट दाखवत - अध्यात्माच्या गूढ प्रदेशात शिरायला लावता. मात्र त्यांना बंड करून उठायला, संघर्ष करून आपले प्रश्न - रस्त्याचे, पुनर्वसनाचे व पुराचा धोका टाळण्यासाठी संरक्षक भिंत बांधून घेण्यासाठी सरकारशी झगडण्याचे शिकवत नाही......। | मोरया गोसावी अक्षयचे अंतस्थ खदखदीतून येणारे उद्रेक शांतपणे झेलत होता, पण नजरेतली स्थितप्रज्ञता आणि निर्विकारपणा काहीसा लोपला होता. “गावाचा प्रश्न पुनर्वसनानं सुटेल. ओढ्याचं पाणी वळवून सुटेल. ते विज्ञान करेल. राज्यकर्ते करतील. तेथे तुमची श्रद्धा, तुमचं दर्शन कुठेतरी फोल आहे असं नाही तुम्हाला वाटत?” तो मोरया गोसावी शांत होता, स्थिर होता. समाधी मघाशीच सोडली असली तरी अजून पद्मासनातच होता. पण पाठीचा कणा किंचित ढिलावला होता. क्षणभर अक्षयला जाणवलं, त्याच्या निस्संगपणाला कुठेतरी सूक्ष्म तडा गेला आहे. त्यानं पुन्हा शून्यात नजर लावली आहे. “शिवशंभो हर हर! बाळ, मी एक निस्संग फकीर. जीवन मरणाचं मला कसलं सोयर सुतक नाही. आपलं सारं जीवन त्या प्रभूच्या इच्छेवरच अवलंबून असतं आणि मरण म्हणजे देहाचं वस्त्र बदलणं! पण या काळात जगताना माणसाला सुख - समाधान मिळालं पाहिजे असं तू म्हणतोस. मग सुख - सुख म्हणजे काय असतं? ते व्यक्तिसापेक्ष असतं, म्हणूनच खोटं, तकलादू असतं. आणि त्यात जितकं गुरफटून जाऊ तितकं त्या प्रभूपासून दूर जाऊ. तसं जाऊ नये म्हणून तो अशा यातना देत असावा, अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळे तुला पडणारे प्रश्न मला पडत नाहीत, सर्पदंशाने त्या अश्राप जिवाचा आज मृत्यू झाला. तो औषधानं वाचला असता, असे तुझं म्हणणं आहे. तुझ्या परीनं ते खरं आहे, पण या तामुलवाडीत पूर्वजन्माच्या कर्मान तो जन्मास आला व तारुण्यातच कष्ट, गरिबी व अस्मानी संकटानं जीर्ण देह त्यागून गेला... हे - हे फार गहन गूढ आहे, बेटा, माझा तेवढा अधिकार नाही, पण...” क्षणभर तो थांबला आणि 'शिवशंभो हरहर शिवशंभो!" असा आपलं सारं बळ १६४ लक्षदीप